कोरोना वाढत असल्याने केंद्राचे राज्याला पत्र, दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असतानाच आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला एक पत्र पाठवण्यात आले आहे. राज्यात पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याच्या सूचना या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.

काय आहे पत्रात?

महाराष्ट्रासह देशातील इतरही काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि दिल्ली सरकारला केंद्र सरकारकडून पत्र पाठवण्यात आलं आहे. चाचणी,लसीकरण,उपचार,कोरोना रुग्णांचं ट्रॅकिंग आणि नियमांचं काटेकोर पालन या पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना या पत्राद्वारे केंद्राकडून राज्य सरकारला करण्यात आल्या आहेत. तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्याचेही सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः कोरोना रुग्णसंख्येत वाढ; राज्यात एकाच दिवसात आढळले दोन हजार रुग्ण)

अशी आहे परिस्थिती

राज्यात बुधवारी एकाच दिवसात कोरोनाचे 2 हजार 701 रुग्ण आढळल्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 806 वर पोहोचली आहे. राज्यात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के एवढे खाली घसरले आहे. मुंबईत मंगळवारपासून रुग्णासंख्या हजारीपार जात असतानाच आता संपूर्ण परिसरातच रुग्ण वाढू लागले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here