पावसा…पावसा ये रे, पाणीकपात नको रे; पाणी साठ्याची पातळी दहा टक्क्यांच्या खाली

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमधील पाणी साठ्याची पातळी आता दहा टक्क्यांपेक्षाही खालच्या दिशेला सरकली आहे. या सर्व तलावांमध्ये बुधवारपर्यंत ९.८९टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक असून आता पावसा पावसा ये रे, पाण्याची कपात नको रे असे म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर येत आहे.

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता

मुंबईला दरदिवशी अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर अर्थात ३८० कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असून २२ जून २०२२ पर्यंत यासर्व धरणांमध्ये एकूण १४ हजार ३१४ कोटी लिटर पाण्याचा साठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांतील सर्वांत कमी पाणी साठा आहे.

( हेही वाचा : शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?)

परंतु एरव्ही हा पाण्याचा साठा काही प्रमाणांत पुरेसा असला तरी मागील काही वर्षांपासून पावसाची हजेरी खऱ्या अर्थाने जुलै महिन्यांमध्ये लागते. त्यातच नाशिक किंवा तलाव क्षेत्रात पाऊस न झाल्यास धरण तसेच तलावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे तलाव क्षेत्रात पाऊस न झाल्यास विलंबाने होणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही. परिणामी कपात लागू होण्याची शक्यता असली तरी सध्या तरी पाण्याच्या साठ्याचा आढावा घेतल्यास कपात लागू करण्याशिवाय पर्याय नाही. पाण्याची पातळी मागील दोन वर्षांपेक्षा खूपच खाली गेल्यानंतरही प्रशासन अजूनही कपातीचा निर्णय जाहीर करत नाही. त्यामुळे प्रशासनाला नक्की पावसावर भरोसा आहे की मुंबईकरांवर पाणी संकट लादण्याचा प्रयत्न आहे.

( हेही वाचा : Earthquake in Afghanistan: अफगणिस्तानात भूकंपाचा कहर; 1000 लोक ठार तर 1500 जखमी)

एकूण आवश्यक पाणी साठा :

  • १लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर( १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष)
  • २२ जूनची मागील तीन वर्षांतील पाण्याच्या पातळी
  • सन २०२२ : १३ हजार ३१४कोटी लिटर( एकूण साठ्याच्या ९.८९टक्के)
  • सन २०२१ : २१हजार ९२७ कोटी लिटर( एकूण साठ्याच्या १५.१५ टक्के)
  • सन २०२०: १५ हजार ११२कोटी लिटर ( एकूण साठ्याच्या १०.४४टक्के)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here