- ऋजुता लुकतुके
लेक्सस या प्रिमिअर कार कंपनीची ही गाडी इतर लेक्सर कारच्या मानाने परवडणारी तरीही मर्सिडिजशी स्पर्धा करणारी आहे. (Lexus UX)
प्रिमिअम एसयुव्ही गाड्यांची ज्यांना हौस आहे अशा लोकांसाठी लेक्ससने आपली नवीन लक्झरी कार लेक्सस युएक्स बाजारात आणण्याची तयारी चालवली आहे. पेट्रोल इंधनावर चालणारी या कारचं इंजिन १९८७ सीसी क्षमतेचं आहे. या गाडीत ४ सिलिंडर असून ती पूर्णपणे ऑटोमेटिक कार आहे. गाडीत एकावेळी ५ लोक बसू शकतील. (Lexus UX)
विशेष म्हणजे या गाडीची भारतातील किंमत अंदाजे ४० लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. म्हणजेच इतर महाग लेक्सस कारच्या तुलनेत हा परवडणारा पर्याय कंपनीने समोर ठेवला आहे. (Lexus UX)
सुरुवातीला ही कार कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असेल असा अंदाज व्यक्त होत होता. पण, सध्या कंपनीने युएक्स कार ही पेट्रोल इंधनाच्या व्हरायटीमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे आणि लेक्ससची पहिली इलेक्ट्रिक कार ही युएक्स ३०० ई ही असेल. (Lexus UX)
View this post on Instagram
(हेही वाचा – Ishwar Sahu : कोण आहेत ईश्वर साहू; ज्यांनी यापूर्वी 7 वेळा आमदार राहिलेले रवींद्र चौबे यांचा पराभव केला…)
लेक्सस कार आपल्या देखण्या एक्टिरिअरसाठी प्रसिद्ध आहे. ही कारही त्याला अपवाद नसेल. बाहेरून स्टायलिश आणि आधुनिक दिसणारी ही गाडी आतूनही प्रशस्त आहे. गाडीला प्रभावी एलईडी हेडलँप देण्यात आले आहेत. तर गाडीची लांबी इतर गाड्यांपेक्षा १३ मीटर लांब आहे. (Lexus UX)
ही गाडी आतूनही प्रशस्त आहे आणि तिचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले १० इंच मोठा आहे. गाडी चालवण्याचा तुमचा अनुभव मात्र भन्नाट असेल असा कंपनीचा दावा आहे. कारण, शून्य ते १०० किमी ताशी इतका पल्ला गाठण्यासाठी कंपनी फक्त ०.७५ सेकंद इतका वेळ घेते. (Lexus UX)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community