भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच एलआयसीच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये लोक पैसे गुंतवत असतात. या गुंतवलेल्या पैशांचा भविष्यात उपयोग व्हावा हा या गुंतवणुकीमागचा हेतू असतो. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकासाठी ग्राहक एलआयसीला पसंती देतात. एलआयसीची अशीच एक योजना म्हणजे आधारशिला. या योजनेच्या मॅच्युरिटीवर जबरदस्त रिटर्न्स मिळणार आहेत.
महिलांसाठी विशेष योजना
महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन एलआयसीने केवळ महिलांसाठी ही आधारशिला योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक करणा-या महिलांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे. या योजनेत दररोज 29 रुपये जमा केल्यानंतर मॅच्युरिटीवर 4 लाख रुपयांपर्यंत रिटर्न मिळू शकतात. 8 ते 55 या वयोगटातील महिला या योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र असणार आहे.
(हेही वाचाः Income Tax च्या नियमांत बदल, करदात्यांना मिळणार मोठा दिलासा)
10 ते 20 वर्षे करा गुंतवणूक
या पॉलिसीमध्ये कोणत्याही महिला कमीत कमी 75 हजार आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपयांचा विमा खरेदी करू शकतात. तिमाही,सहामाही आणि वार्षिक आधारावर या योनेंतर्गत महिला गुंतवणूक करू शकतात. कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 20 वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करायची आहे.
इतका मिळेल परतावा
जर 20 वर्षांसाठी नियमित पैसे गुंतवल्यास एकूण गुंतवणुकीची रक्कम ही 2 लाख 14 हजार रुपये होईल. या रक्कमेवर मॅच्युरिटीच्या वेळी महिलांना 3 लाख 97 हजारांपर्यंत परतावा मिळणार आहे. आधारशिला योजनेतील लाभार्थी महिलेचा मृत्यू झाल्यास तिच्या घरातील सदस्यांना जमा झालेली रक्कम देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community