महिलांसाठी LIC आधारशिला योजना! दररोज २९ रुपयांच्या बचतीमुळे तयार होईल ४ लाखांचा फंड

भविष्याचा विचार करून अनेक लोक विविध योजना, म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करतात. महिलांच्या उज्जव भविष्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ची आधारशिला योजना अतिशय फायदेशीर आहे. ८ ते ५५ वर्षे या वयोगटातील महिला एलआयसीच्या या आधारशिला योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही रोज २९ रुपये जमा केलेत तर तुम्हाला मॅच्युरिटीवर ४ लाख रुपये मिळू शकतात. या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊया…

( हेही वाचा : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त शिल्पकाराने साकारले पाच फुटी वाळूचे शिल्प; पहा फोटो)

महिलांसाठी आधारशिला योजना 

जर एखाद्या महिलेने दिवसाला २९ रुपये वाचवले तर ती एका वर्षात LIC आधारशिलामध्ये १० हजार ९५९ रुपये गुंतवेल. ( २० वर्षे दरमहा ८९९) जर त्या महिलेने २० वर्षे अशीच गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवेळी या महिलेला जवळपास चार लाख रुपये मिळतील. समजा एखादी स्त्री योजना सुरू करताना ३० वर्षांची असेल तर २० वर्षांनी तिचे २ लाख १४ हजार ६९६ रुपये जमा होतील परंतु संबंधित महिलेच्या गुंतवणुकीचे मूल्य मॅच्युरिटीने ३ लाख ९७ हजार रुपये होईल.

पॉलिसीचे हफ्ते तुम्ही मासिक, तिमाही किंवा सहामाही पद्धतीने भरू शकता. पॉलिसी घेतल्यानंतर विमाधारकाचा निर्णय बदल्यास रद्द करण्याची मुभा सुद्धा एलआयसीने दिली आहे. एलआयसीद्वारे ही विशेष सुविधा प्रदान केली जाते. परंतु तुम्हाला फक्त १५ दिवसांच्या आत पॉलिसी रद्द करता येऊ शकते. महिलांच्या उज्जव भविष्यासाठी आणि आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग म्हणून एलआयसीने ही योजना महिलांना उपलब्ध करून दिली आहे.

अटी व नियम

  • ज्या महिलांचे आधार कार्ज आहे अशाच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • एलआयसीची ही योजना पॉलिसीधारक आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करणार, निश्चित रक्कम महिलेच्या घरातील सदस्यांना दिली जाईल.
  • एलआयसीची ही योजना फक्त महिलांसाठी आहे. यात ८ वर्ष वयापासून ते ५५ वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करता येते.
  • पॉलिसीधारक कोणतीही महिला ७५ हजार रुपये ते कमाल ३ लाखांचा विमा खरेदी करू शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here