Kanyadan Scheme : मुलीचे भविष्य करा सुरक्षित! १३० रुपये गुंतवा २७ लाख मिळवा; जाणून घ्या या योजनेविषयी….

99

आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची चिंता प्रत्येक पालकांना असते. त्यामुळे मुली जन्माला आल्यापासूनच पालक विविध योजनांमध्ये गुंतवणूकीचे पर्याय निवडतात, जेणेकरून मुलीच्या लग्नाला सुद्धा पुरेसे पैसे जमा होती. आम्ही तुम्हाला अशा योजनेविषयी माहिती देणार आहोत जी योजना तुम्हाला लहान गुंतवणुकीतून मोठा परतावा देईल. LIC कन्यादान पॉलिसीविषयी जाणून घेऊया…

( हेही वाचा : Shraddha Murder Case : जंगलात सापडलेले नमुने श्रद्धाचेच! वडिलांशी DNA झाला मॅच; पॉलिग्राफ चाचणीत धक्कादायक माहिती उघड)

एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना भारतातील आयुर्विमा कंपनीने मुलींचे लग्न, शिक्षणातील गुंतवणुकीसाठी जारी केली आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक करू शकते. ही योजना २५ वर्षांसाठी आहे. या अंतर्गत, लोकांना दररोज १३० रुपये वाचवून दरमहा ३ हजार ६०० रुपये प्रिमियम भरावा लागेल, परंतु लोकांना फक्त २२ वर्षांसाठी प्रिमियम भरावा लागेल. LIC कन्यादान पॉलिसी योजनेअंतर्गत दरमहा १३० रुपयांच्या बचतीवर तुम्हाला २७ लाखांचा परतावा मिळेल. त्याचबरोबर आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत तुम्हाला १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट देखील मिळेल.

कन्यादान योजना नेमकी कशी आहे?

२५ वर्षांची गुंतवणूक असल्याने LIC ने या पॉलिसीला कन्यादान असे नाव दिले आहे. जेणेकरून पालकांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करता येतील. एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीचाय कस्टमाइज प्लॅन अंतर्गत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

फायदे काय?

LIC कन्यादान पॉलिसी २५ वर्षांची असून शेवटच्या तीन वर्षांत प्रिमियम भरायची गरज नाही.

संबंधित पालकांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची एकरकमी रक्कम तसेच प्रिमियममध्ये सूट उपलब्ध आहे. जर मृत्यू साध्या कारणांमुळे झाला असेल तर ५ लाख रुपये एकरकमी दिले जातील आणि नंतर दरवर्षी ५० हजार रुपये आणि मॅच्युरिटीनंतर पूर्ण पैसे मिळतील.

पॉलिसी वयोगट कोणता आहे?

LIC कन्यादान पॉलिसीमध्ये फक्त वडील गुंतवणूक करू शकतात. वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि ५० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही योजना घेण्यासाठी तुम्हाला एलआयसी एजंटशी संपर्क करून सांगावे लागेल. संबंधित एजंट तुम्हाला हा प्लॅन जीवन लक्ष्य पॉलिसी कस्टमाइज करून तुम्हाला देईल. मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र अशी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.