- ऋजुता लुकतुके
एलआयसीच्या जीवन उत्सव योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे कंपनीला शेअर बाजारात पुन्हा अच्छे दिन आले आहेत. (LIC Market Cap @5 lakh cr)
भारतीय जीवन बीमा निगम अर्थात एलआयसी कंपनीने गुरुवारी पुन्हा एकदा शेअर बाजारात ५ लाख कोटी रुपये इतकं भांडवली मूल्य गाठलं आहे. बाँबे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीचा शेअर पाच टक्क्यांनी उसळून गुरुवारी बंद होताना ७८५.५० अंशांवर स्थिरावला. इतकंच नाही तर अख्ख्या आठवड्यात कंपनीचं मूल्य जवळ जवळ २० टक्क्यांनी वाढलं आहे आणि त्यामुळे भांडवली मूल्यात ही वाढ झाली आहे. (LIC Market Cap @5 lakh cr)
(हेही वाचा – DCM Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहमतीने मार्ग काढणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आश्वासन)
गुरुवारी एलआयसीच्या समभागांनी एनएससीवर ८०० आणि बीएससीवर ७९९.९० असा ५२ आठवड्यांतील उच्चांकही गाठला. एलआयसी ही देशातील भांडवली मूल्याच्या निकषावर दुसऱ्या क्रमांकाची मोठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. (LIC Market Cap @5 lakh cr)
गुरुवारी शेअर बाजारात किरकोळ घसरण झालेली असताना एलआयसीच्या समभागांना मात्र मागणी होती आणि एनएससीवर १.५५ कोटी तर बीएससीवर ५.६६ कोटी समभागांची खरेदी-विक्री झाली. (LIC Market Cap @5 lakh cr)
Biggest Intraday Gain in LIC in History of 381 Sessions
Market Cap Gained by 36,000 Cr in one Session
Biggest Intraday Gains
Today: +9.30%
14th Nov 2022: +9.11%
19th Dec 2022: +7.70%
11th Aug 2023: +5.80%
15th June 2022: +5.24%
26th July 2022: +5.05%Largest Insurance… pic.twitter.com/LNvqF7ZTDK
— Sumit Mehrotra (@SumitResearch) November 24, 2023
(हेही वाचा – Online Game 52 Arrested : ऑनलाईन गेममधून युवकांची फसवणूक, ३ वर्षात ३६ गुन्हे दाखल, ५२ अटकेत)
डिसेंबर महिन्यात एलआयसीने जीवन उत्सव ही नवीन विमा योजना बाजारात आणली आहे. ही पारंपरिक विमा योजना आहे आणि यातील पैसे शेअर बाजारात गुंतवले जात नाहीत. तसंच या योजने अंतर्गत तुम्हाला वर्षाला लाभांशही मिळत नाही. किंवा कंपनीला झालेल्या नफ्याचा हिस्सा कुठल्याही स्वरुपात तुम्हाला दिला जात नाही. फक्त विमाधारकाच्या मृत्यूनंतर ते पैसे नामांकन झालेल्या व्यक्तीला आधी निवड केलेल्या पद्धतीने मिळतात. अगदी महिन्याच्या महिन्याला काही पैसे काढण्याची सोयही यात आहे. (LIC Market Cap @5 lakh cr)
ही अत्यंत पारंपरिक विमा योजना असतानाही १ डिसेंबरला झालेल्या लाँचिंग नंतर या योजनेला खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय आणि एलआयसीचा समभाग वाढण्यामध्ये हे एक मोठं कारण आहे. (LIC Market Cap @5 lakh cr)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community