LIC Policy Online : एलआयसीचा विमा आता ऑनलाईन, पॉलिसीधारकांसाठी नवीन मार्टेक प्लॅटफॉर्म

LIC Policy Online : मार्टेक म्हणजे मार्केटिंगमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर असा होतो.

133
LIC Jeevan Utsav : एलआयसीच्या जीवन उत्सव योजनेतून निवृत्तीनंतर मिळवा दरमहा १५,००० रु
  • ऋजुता लुकतुके

भारतीय आयुर्विमा महामंडळाची एलआयसी पॉलिसी आता आणखी एका बदलासाठी सज्ज झाली आहे. तुमची पॉलिसी तुम्हाला ऑनलाईन मिळायला सुरुवात झालीच आहे. आता पॉलिसीसंबंधित सर्व ऑनलाईन व्यवहारांसाठी एलआयसीने मार्टेक हे नवीन डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. लोकांचं विमा पॉलिसीविषयीचं काम त्यामुळे अगदी सोपं होणार आहे. त्याचबरोबर एलआयसीची विश्वासार्हता वाढेल असंही महामंडळाला वाटतंय. एलआयसीच्या डिजिटल व्यासपीठाचं नाव आहे डाईव्ह. (LIC Policy Online)

(हेही वाचा – ‘ट्रेन द ट्रेनर्स’ उपक्रमाची सुरुवात; ITI प्रशिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण)

मार्केटिंग टेक्नॉलॉजी, किंवा “मार्टेक”, ही एक संकल्पना आहे, ज्यामुळे मार्केटिंग किंवा विपणन हे सुटसुटीत, स्वयंचलित आणि जलद गतीनं होतं. विपणन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर असा याचा सोपा अर्थ आहे. विमा कंपनीला लोकांपर्यंत अधिक सोप्या पद्धतीने पोहोचता येणार आहे. तसंच ग्राहकांना त्यांच्या अडचणी ऑनलाईन तंत्रज्जानाच्या मदतीने ताबडतोब सोडवून मिळणार आहेत. त्यासाठी एलआयसी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमच्यासाठी योग्य पॉलिसी निवडायलाही ही यंत्रणा तुम्हाला मदत करेल. हे कंपनीसाठी डिजिटल परिवर्तन असल्याचं एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती म्हणाले. (LIC Policy Online)

(हेही वाचा – Yashasvi Jaiswal Injured : यशस्वी जयस्वाल रणजीचा उपांत्य सामना का खेळत नाही?)

पॉलिसी धारकाला एजंटशी अधिक सोप्या पद्धतीने जोडणारी ही यंत्रणा असेल, असं ते म्हणाले. मार्टेक हा कंपनीचा धोरणात्मक निर्णय आहे. हा एक धोरणात्मक बदल आहे. येणारा काळ हा डिजिटल विम्याचा असेल आणि त्यासाठी एलआयसी आता सज्ज होत आहे. नवीन ग्राहक शोधणं, त्यांना पॉलिसी योग्य पद्धतीने समजावून सांगणं, लोकांच्या शंकांचं निरसन आणि समस्या सोडवणं ही कामं आता ऑनलाईन आणि अधिक सोप्या पद्धतीने होऊ शकतील. (LIC Policy Online)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.