भविष्यातील संकटांसाठीची तरतूद म्हणून अनेक जण एलआयसी पॉलिसी घेतात. जर तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असेल किंवा तुम्ही नवीन पॉलिसी घ्यायचा विचार करत असाल तर एलआयलसीचा बदललेला हा नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. नाहीतर भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबीयांना क्लेम केलेली रक्कम मिळवण्यात अडचण येऊ शकते.
नॉमिनी ठेवणे अनिवार्य
एलआयसी पॉलिसी खरेदी करताना आता पॉलिसीधारकाने कुटुंबातील एका व्यक्तीची नॉमिनी म्हणून नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे. हा नियम आता अनिवार्य करण्यात आला आहे. समजा पॉलिसीधारकाचा भविष्यात अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला थेट मदत मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. नॉमिनी बनवताना जर दोन व्यक्तींमध्ये पैसे विभागायचे असल्यास पॉलिसी खरेदी करताना एकापेक्षा जास्त व्यक्तींचा हिस्सा ठरवून नॉमिनी बनवू शकता. अशावेळी कंपनीला लेखी हमीपत्र देखील सादर करावे लागू शकते.
अशी करा नॉमिनीची निवड
पॉलिसीधारकांना कालानुक्रमे नॉमिनी बदलण्याची मुभा देखील देण्यात येते. नॉमिनीच्या आकस्मिक मृत्यूनंतर दुस-या व्यक्तीला नॉमिनी म्हणून निवडता येते. तसेच विवाह किंवा घटस्फोटानंतरही आपल्याला आपला नॉमिनी बदलता येतो. विमा कंपनीच्या वेबसाईटवरुन नॉमिनी फॉर्म डाऊनलोड करुन भरता येतो. नॉमिनीचे डिटेल्स यामध्ये भरुन आपल्याला नॉमिनीची निवड करता येते.
Join Our WhatsApp Community