खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र चालकांनी बी-बियाणे, खत व किटकनाशके अधिनियमांचे पालन करून व्यवसाय करावा व शेतक-यांना चांगली सेवा द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. खरीप हंगाम २०२२-२३ नियोजन व खत उपलब्धता संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. ई-पॉश वरून खताची विक्री न करणाऱ्या व ऑफलाईन खत विक्री करणाऱ्या अशा खत विक्री कृषि सेवा केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याच्या सूचना यावेळा जिल्हाधिका-यांनी केल्या.
अशा कृषि सेवांचे परवाने रद्द
बैठकीमध्ये खरीप हंगाम २०२३ साठी खत पुरवठ्याचे नियोजन व मागणीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात ई-पॉस अहवालानुसार युरिया २०.९६० मे. टन, डि. ओ. पी ४६३० मे.टन. एम. ओ. पी. ५३८३ मे.टन. संयुक्त खते १५.९६८ मे.टन., एस. एस. पी. ८५९९ मे. टन असा एकूण ५५ हजार ५४८ मे.टन शिल्लक साठा आहे. ई-पॉश वरून खताची विक्री न करणाऱ्या व ऑफलाईन खत विक्री करणाऱ्या अशा खत विक्री कृषि सेवा केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या. २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील सर्व निरीक्षकांनी काढलेल्या बियाण्यांचे २७ नमुने, खतांचे ५६ नमुने व किटकनाशकांचे ७ नमुने कोर्टकेस पात्र होते. यापैकी २७ बियाणे कोर्ट केस दाखल करण्यात आल्या. खतामध्ये एकूण ११ कोर्टकेस व किटकनाशकामध्ये २ कोर्ट केस दाखल करण्यात आल्या. खताची विक्री पॉश मशिनव्दारे करताना, अनियमितता आढळून आल्याने चार कृषि केंद्र धारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
सहा खत विक्री केंद्र धारकांचे परवाने निलंबित करण्यात आले ते पुढील प्रमाणे –
हनुमान शेती सेवा केंद्र भडगाव, ता. कागल, श्री टाईल्स ॲण्ड ट्रेडर्स फर्टिलायझर म्हाकवे, भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ पिंपळगांव ता. भुदरगड , शेतकरी कृषि सेवा केंद्र, आवळी ता.पन्हाळा, जोतिर्लिंग सहकारी भात खरेदी विक्री संस्था मर्या. खोतवाडी ता. पन्हाळा, विनय अॅग्रो कृषि सेवा केंद्र, कोडोली ता. पन्हाळा, गोल्डन अॅग्रो इनपूटस, रूकडी ता. हातकणंगले, बळीराजा शेती सेवा केंद्र निळपण ता. भुदरगड, शेतकरी सहकारी ता.ख विक्री संघ यवलूज ता. पन्हाळा, पांडूरंग कृषि सेवा केंद्र कोतोली रोड माळवाडी ता. पन्हाळा, जाधव कृषि सेवा केंद्र कोतोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर, विघ्नेश फर्टिलायझर्स तिरपण ता. पन्हाळा, यशवंत सहकारी तालुका खरेदी विक्री संघ लि. शाखा यशवंत बझार बाजार भोगाव ता. पन्हाळा, श्री हनुमान वि.का.स. (विकास) संस्था मर्या. कुशिरे ता. पन्हाळा, श्री. बलभीम विकास (वि) सेवा संस्था मर्या. क. बोरगाव (खत विभाग) ता. पन्हाळा तसेच बापूसो कृषि सेवा केंद्र कुंभोज (किटकनाशक) ता.हातकणंगले या किटक नाशक कृषि केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
( हेही वाचा: अजित पवार मांडणार राज्याचा अर्थसंकल्प, कोणत्या नव्या घोषणा होणार? )
या केंद्रांचा परवाना रद्द
सन २०२१-२२ मध्ये सल्फर ९० टक्के खताची विना परवाना विक्री करत असताना, श्रावण कृषि सेवा केंद्र शिरोळ व खत उत्पादक रूक्मीणी अॅग्रो सर्व्हिसेस, सांगली यांच्यावर पोलीस केस दाखल करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे बापूसो कृषि सेवा केंद्र कुंभोज या किटकनाशक विक्री केंद्र व जे.बी.सी. क्रॉप सायन्स वापी गुजरात या उत्पादक किटकनाशक कंपनीवर पोलीस केस दाखल करण्यात आली आहे. तसेच बापूसो कृषि सेवा केंद्र कुंभोज या किटकनाशक विक्री केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे.
Join Our WhatsApp Community