केंद्राने निवृत्ती वेतनधारकांना दिला दिलासा! काय घेतला निर्णय?

71

निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सरकारी निवृत्ती वेतनधारकांना वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आले आहे. त्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 होती. पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभागाने 31 डिसेंबर 2021 रोजी जारी केलेल्या निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, सरकारने यावर्षी दुसऱ्यांदा जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. साधारणपणे हे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर असते.

प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 महिन्यांचा अतिरिक्त वेळ

यापूर्वी ही तारीख 30 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ती 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सर्व राज्यांमध्ये कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता आणि कोरोनाच्या धोक्यापासून वृद्धांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख वाढवली ​​आहे. या मुदतवाढीच्या कालावधीपर्यंत पेन्शनधारकांना निवृत्ती वेतन दिले जाईल. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख वाढवल्याने ज्या पेन्शनधारकांना अद्याप कोणत्याही कारणास्तव त्यांचे प्रमाणपत्र दाखल करता आले नाही, त्यांना दिलासा मिळेल. यामुळे त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 महिन्यांचा अतिरिक्त वेळ मिळेल. पेन्शनधारकाला त्याचे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. प्रत्येक पेन्शनधारकाला वार्षिक आधारावर 30 नोव्हेंबरपर्यंत त्याचे जीवन प्रमाणपत्र दाखल करावे लागते.

(हेही वाचा मुंबईत कोविड बाधितांची रुग्ण संख्या ६ हजार पार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.