बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे (Chandrapur Heavy Rain) महाराष्ट्रात चांगल्या पावसाची आशा पल्लवीत झाल्या आहेत. २१ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. त्यानंतर लगेच कडक ऊन पडत असल्याने जणू काही ऊन-पावसाचा लपंडावच सुरू असल्याचा अनुभव चंद्रपूरसह वैदर्भीयांना येत आहे. पण आता चांगला पाऊस झाला आहे.परिणामी शहरातील सखल भागात पाणी साठले.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
शहरात सलग दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे (Chandrapur Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी साचले. बालवीर वार्डातील अनेक घरात पाणी शिरले असून मुख्य मार्गावर आझाद बगीचाजवळ सर्वत्र पाणीच पाणी आहे. शहरातील अनेक रस्त्यांना जलतरण तलावाचे स्वरूप आले आहे.
(हेही वाचा – Khalistan In Canada : भारतातील फरार गँगस्टर सुक्खाची कॅनडात गोळ्या झाडून हत्या; सुक्खा खलिस्तानी दहशतवाद्याचा राईट हँड)
गुरुवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता हलक्या पावसाच्या (Chandrapur Heavy Rain) सरी पडल्या. मात्र आकाशात ढगांची गर्दी दाटलेली होती. अशातच ११.४५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर सर्वदूर पाणी साचले. मुख्य मार्गावरील आझाद बगीचा आणि कस्तुरबा मार्गांना जलतरण तलावाचे स्वरूप आले होते. अवघ्या दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने सखोल भागात पाणी शिरले.
शहरातील राजकला टॉकीज मागील बालवीर वार्ड परिसरातून मोठा नाला वाहतो. पावसामुळे हा नाला दुथडी भरून वाहू लागला. नाल्याचे पाणी रस्त्यावर आले आणि संपूर्ण रस्ता व हा परिसर जलमय झाला. दुचाकी व चारचाकी वाहनेदेखील पाण्याखाली आली होती. अवघ्या दीड तासाच्या पावसाने पुन्हा एकदा सर्व परिसर जलमय झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community