ID आणि Password हॅक झाला तर काय कराल?

143

इंटरनेटच्या जमान्यात अनेक कारणांसाठी सोशल मीडिया किंवा ई- मार्केटिंग पोर्टल्सवर आपल्याला नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर असा तपशील नोंदवावा लागतो. त्यामुळे आपला ID हॅक होण्याची शक्यता पूर्णत: नाकारता येत नाही. मुळातच संशयास्पद साईट्स वाटतील त्या सरळ ब्लाॅक करा.

ग्राहकाला अधिकृत ई- मेलवरुनच आल्यासारखा वाटणारा बनावट ई-मेल पाठवला जातो. त्यातल्या हायपर लिंकवर क्लिक केले की, ख-या अधिकृत इंटरनेट बॅंकिंग साईटसारखी दिसणारी पण प्रत्यक्षात बनावट वेबसाईट उघडते. सामान्यत: या ई-मेलमध्ये काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, बक्षीस देण्याची किंवा प्रक्रिया पूर्ण न केल्याबद्दल दंड आकारण्याची सूचना दिलेली असते. ग्राहकाला लाॅग-ईन किंवा प्रोफाईल किंवा पासवर्ड तसेच बॅंक खाते क्रमांक इत्यादी गोपनीय माहिती देण्यास सांगितले जाते. ग्राहक विश्वासाने सबमिट बटणावर क्लिक करतो आणि जाळ्यात अडकतो. इंटरनेट वापरताना नेहमी अॅड्रेस बारमध्ये योग्य URL टाईप करुन साईटवर लाॅगऑन करावे. आपला अधिकृत आयडी आणि पासवर्ड देण्यापूर्वी लाॅगईन पेजचे युआरएल (URL)’https://’ यापासून सुरु होत असल्याचे आणि ‘http://’ नसल्याची खात्री करुन घ्या. यातील एस चा (S) अर्थ पेज सुरक्षित आहे, असे यावरुन स्पष्ट होते. नेहमी, browser च्या खाली असलेले लाॅक चिन्ह शोधा. बॅंक आपल्या खात्याच्या माहितीसाठी कधीही ई-मेलद्वारे संपर्क साधत नाही, हे लक्षात ठेवा.

( हेही वाचा: Metro-3: “हा ऐतिहासिक क्षण, आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही”,उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.