गणरायांच्या आगमनाला पावसाच्या हलक्या सरींची हजेरी

119

राज्यात गणरायाच्या आगमनाला तीन दिवस उरलेले असताना गेल्या आठवड्यातून ब्रेकवर गेलेल्या पावसाला येत्या काही दिवसांत फारसा जोर नसेल. बुधवारी कोकणात मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड जिल्ह्यांत गणेश भक्तांना वरुण राजाने दिलासा दिला आहे. या जिल्ह्यांत हलक्या पावासाची शक्यता आहे, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

या जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी

आठवड्याच्या सुरुवातीलाही कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात पावासाची गैरहजेरी राहील. मंगळवारपासून राज्यात हलक्या पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात होईल. मंगळवारी कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजेच्या गडगडाटासह मेघगर्जना आणि हलका पाऊस राहील. दोन्ही जिल्ह्यांत 30/40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील.

सांगली, सोलापूर जिल्ह्यात रविवारपासून हा प्रभाव सुरु राहील. हिंगोलीत रविवारपासून दोन दिवस, नांदेडमध्ये रविवारपासून बुधवारपर्यंत ताशी 30/40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतही सोमवारपासून वाऱ्यांचा प्रभाव बुधवारपर्यंत दिसून येईल.

विदर्भात पावासाची हजेरी

विदर्भातही या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता नाही. बुधवारी गणपतीच्या आगमनाच्यावेळी संपूर्ण विदर्भात प्रामुख्याने पावसाचे शिडकावे राहतील. मंगळवारपर्यंत संपूर्ण विदर्भात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट राहील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.