राज्यातील पावसाने (Rain) गेल्या काही दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र कालपासून (मंगळवार, ८ ऑगस्ट) राज्यातील काही भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या काही निवडक भागाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
(हेही वाचा – Organ Donation : नागरिक जागृत, सलग दोन दिवसांत १२ अवयवदान)
मुंबई आणि कोकणाच्या काही भागात पावसाच्या (Rain) हलक्या सरी बसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अधूनमधून या भागांमध्ये लख्ख सूर्यप्रकाशही पाहता येणार आहे.
वाशिम जिल्ह्याला पुढच्या २ दिवसांसाठी पावसाचा (Rain) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारीसुद्धा शहरात मुसळधार पाऊस झाला. मात्र तरीदेखील बुलढाणा जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट कायम आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातल्या सर्व प्रकल्पांमध्ये ३१.५९ टक्के पाणीसाठा आहे. अशातच आता ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस कोरडे गेल्याने आता पुढच्या आठवड्यात तरी पाऊस पुन्हा जोर धरणार का याकडेच सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community