गौरी-गणपती विसर्जनाला मेघगर्जेनेसह राहणार पावसाची हजेरी

108
मुंबई, ठाण्यात उन्हाच्या कडक्याने वैतागलेल्या गणेशभक्तांना सायंकाळी हलका पाऊस अनुभवता येईल. सायंकाळी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. गौरीसह गणपती विसर्जनाला भक्तांना उन्हाच्या दा्हापासून वाचवण्यासाठी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावातील. त्यामुळे सायंकाळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेशभक्तांना छत्रीचा आधार घ्यावा लागेल. मात्र पावसाचा जोर जास्त नसल्याने कमाल तापमानात वाढ झालेली असेल.

दुपारी आद्रतेचे प्रमाणही जास्त

गणपतीच्या पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी वरुणराजाने सायंकाळी आणि रात्री आवर्जून हजेरी लावली होती. शनिवारी रात्री पावसाचा जोर जास्तच असल्याने विकेंडला सार्वजनिक गणेशोत्सव अनुभवायला निघालेल्या गणेशभक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवारी दिवसभर पाऊस गायब राहिला. दुपारी आद्रतेचे प्रमाणही जास्त असल्याने रविवारी गणेशभक्तांना घामाच्या धारांनी हैराण करून ठेवले. सोमवारी सकाळीही पाऊस गायब होता. ढगाळ वातावरणात सूर्य डोक्यावर चढण्यापूर्वीच उष्णतेचा दाह जास्तच जाणवत होता. गर्दी टाळण्यासाठी दुपारीच गौरीसह गणपती विसर्जनाला निघालेले गणेशभक्त झाडाच्या सावलीचा आधार घेत गणरायाची विसर्जनपूर्वीची आरती करत होते. मात्र सायंकाळी उन्हाचा दाह कमी झाल्यानंतर गणेशभक्तांची गणरायाच्या विसर्जनासाठी तलाव, चौपाट्यावर गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.