lightning Strikes: गुजरातमध्ये वीज पडून २० जणांचा मृत्यू, अमित शहा यांनी दिले मदतीचे आश्वासन

स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे.

244
lightning Strikes: गुजरातमध्ये वीज पडून २० जणांचा मृत्यू, अमित शहा यांनी दिले मदतीचे आश्वासन
lightning Strikes: गुजरातमध्ये वीज पडून २० जणांचा मृत्यू, अमित शहा यांनी दिले मदतीचे आश्वासन

गुजरातमध्ये  अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान येथे वीज (lightning Strikes) पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे.

गुजरातमधील दाहोदमध्ये सर्वाधिक चार जणांचा मृत्यू झाला. भरुचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातमधील विविध भागात वीज पडण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मदतीचे आश्वासन दिले आहेत. तर स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे.

(हेही वाचा – Jammu-Kashmir: काश्मीरात दहशतवाद्यांच्या ४ हस्तकांना अटक )

केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘X’द्वारे व्यक्त केल्या भावना…
“गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या अपरिमित हानीबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासनाने मदतकार्यात गुंतले आहेत, जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे,” असं शाह यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोमवारपासून पावसामध्ये घट होण्याचा अंदाज  
SEOC (State Emergency Operation Centre) माहितीनुसार, गुजरातच्या सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यांमध्ये 16 तासांत 50-117 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारपासून पावसामध्ये हळूहळू घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.