WhatsApp Feature: इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअॅपवरही दिसणार जाहिराती, व्हॉइस मेसेज आणि स्टिकर फिचरवरही काम सुरू

132
Whatsapp Favorite Feature : व्हॉट्सॲपवर महत्त्वाचे चॅट्स आणि समुह प्राधान्यक्रमाने वर ठेवण्याची सोय

इन्स्टाग्रामवर स्टोरीज पाहताना जाहिराती दिसतात, तसेच फिचर (WhatsApp Feature) आता व्हॉट्सअॅपवरदेखील येणार असल्याची माहिती ब्राझीलमधील कंपनीचे प्रमुख विल कॅथकार्ट (Will Cathcart heads the company in Brazil) यांनी दिली आहे. यासोबतच व्हॉट्सअॅप चॅनल्सवर व्हॉइस मेसेज आणि स्टिकर फिचर देण्यावरही काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

व्हॉट्सअॅपवर ज्या जाहिराती येतील त्या इनबॉक्समध्ये न दिसता स्टेटस किंवा चॅनल्समध्ये दिसू शकतात, मात्र हे कधीपासून लागू होईल याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. यासोबतच व्हॉट्सअॅप चॅनल्सवर व्हॉइस मेसेज आणि स्टिकर फिचर देण्यावरही काम सुरू त्यांनी सांगितलं.

(हेही वाचा – Dhanteras : धनत्रयोदशीला कोणत्या वस्तूंची खरेदी कराल, जाणून घ्या… )

२०१९ साली व्हॉट्सअॅपने एका बीटा व्हर्जनमध्ये स्टेटसमध्ये जाहिराती दाखवण्याबाबत चाचणी घेण्यात आली होती, मात्र हे फिचर सर्वांसाठी लागू करण्यात आलं नाही. यावर्षी सप्टेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपवर जाहिराती येणार असल्याची बातमी सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली होती, मात्र विल यांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं, मात्र आता याबाबत त्यांनीच संकेत दिले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.