Tamilnadu मध्ये पुन्हा भाषिक द्वेषाचे राजकारण; बदलले रुपयाचे चिन्ह

62

तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) गेले काही दिवस भाषिक वाद सुरु आहे. द्रमूकच्या एम के स्टॅलिन (MK Stalin) सरकारने केंद्र सरकारने हिंदीची सक्ती केल्यात भाषिक युद्ध पेटवण्याची चेतावणीही दिली होती. आता या वादात रुपयाच्या चिन्हाची भर पडली आहे.

भारताचे चलन असलेल्या रुपयाचे अधिकृत चिन्ह म्हणून ‘₹’ चिन्हाचा वापर केला जातो. त्रिभाषा शैक्षणिक धोरणामुळे सध्या तमिळनाडूमध्ये सुरू असलेल्या हिंदी आणि तमिळ भाषा वाद (hindi tamil dispute) सुरु झाला आहे. त्यातून देशाला शह देण्यासाठी तमिळनाडू सरकारने पुन्हा एकदा फुटीरतावादी निर्णय घेतला आहे. तमिळनाडूमधील एम के स्टॅलिन यांच्या सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामधून (tamilnadu budget 2025) ‘₹’ चिन्ह हटवले आहे. त्या जागी ‘ரூ’ या तमिळ चिन्हाने घेतली आहे.

(हेही वाचा – मतदारयादीतील कथित घोळ; Political Party यांना निवडणूक आयोगाचे चर्चेचे निमंत्रण)

तमिळनाडूतील द्रमूक सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून रुपयाचे राष्ट्रीय चिन्ह काढून, त्याऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावले आहे. ‘ரூ’ चिन्हाचा अर्थ तमिळ भाषेत रुपये असा होतो. स्टॅलिन सरकारने भाषित द्वेषापोटी जे चिन्ह वापरणे टाळले आहे, ते ‘₹’ हे चिन्ह एका तमिळ व्यक्तीनेच बनवले आहे आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असतांनाच ते लागू करण्यात आले होते. भारतीय शिक्षणतज्ञ आणि डिझायनर उदयकुमार धर्मलिंगम (Udayakumar Dharmalingam) यांनी ‘₹’ हे चिन्ह तयार केले होते. उदय कुमार धर्मलिंगम यांचे वडील द्रमुक नेते होते. असे असूनही द्रमूकच्याच सरकारने ‘₹’ हे चिन्ह वापरणे टाळले आहे.

उदयकुमार धर्मलिंगम यांनी भारतीय तिरंग्यापासून प्रेरणा घेऊन देवनागरी ‘र’ आणि रोमन अक्षर ‘R’ एकत्र करून रुपयाचे चिन्ह ‘₹’ तयार केले होते. हे नवीन चिन्ह 15 जुलै 2010 या दिवशी भारत सरकारने लोकांसमोर सादर केली.

भाजपची टीका

“द्रमुक सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले आहे. हे डिझाइन एका तमिळ व्यक्तीने तयार केले होते आणि संपूर्ण भारताने स्वीकारले. हे चिन्ह तयार करणाऱ्या उदयकुमारचे वडील द्रमुक आमदार होते. मुख्यमंत्री स्टॅलिन, तुम्ही किती मूर्ख असू शकतात…” अशी टीका तामिळनाडू (Tamilnadu) भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.