…तर तुमचे पॅनकार्ड बाद होणार! आयकर विभागाने नागरिकांना दिला इशारा

आधार पॅन कार्डला लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. गेल्या काही महिन्यांपासून पॅन आधारला लिंक करण्यासाठी आयकर विभागाने सूचना दिल्या होत्या. आता लिंक प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यास आयकर विभागाने नकार दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने ३० जूनपासून आधार पॅनशी लिंक करण्यासाठी १ हजार रुपये दंड आकारला होता. दंड भरल्याशिवाय कोणीही पॅन आधारला लिंक करू शकणार नाही. ३१ मार्च २०२३ पर्यंत आधार पॅन लिंक प्रक्रिया सुरू राहिल त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : पोस्टाच्या योजनेत २६७ रुपये गुंतवा, २.४४ लाखांपर्यंत परतावा मिळवा! काय आहे ही भन्नाट सरकारी योजना)

आयकर विभागाने ट्वीट करत पॅनशी आधार लिंक न केलेल्या नागरिकांना इशारा दिला आहे. आयकर कायदा १९६१ नुसार सर्व पॅन धारकांसाठी ३१ मार्च २०२३ ही तारीख पॅन आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. जर पॅन आधारशी लिंक केले नसेल तर तुमचे पॅनकार्ड बाद होणार असे या ट्वीटमध्ये नमूद केलेले आहे.

ज्या नागरिकांचे पॅन कार्ड ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक केले जाणार नाही असे सर्व पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय तुम्ही तुमचे बंद पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरत असाल तर तुम्हाला दंडही होऊ शकतो. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२B अंतर्गत तुम्हाला १० हजारांपर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

असे करा आधार कार्डशी पॅन लिंक

  • आयकर विभागाची अधिकृत वेबासाईट www.incometax.gov.in वर लॉग इन करा .
  • क्विक लिंक्समध्ये जा आणि आधार लिंकवर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रिनवर एक नवीन विंडो ओपन होईल. तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक येथे टाका.
  • I validate my Aadhaar Details हा पर्याय निवडा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर OTP प्राप्त होईल.
  • validate पर्यायावर क्लिक करा. दंड भरल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here