तुमचे IRCTC अकाऊंट ‘आधार’सोबत लिंक आहे का? नसेल तर करा, मिळणार हा फायदा

137

तुम्ही ट्रेनने प्रवास करताय तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. देशातील बरेच नागरिक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. यावेळी काही प्रवासी तिकीट रेल्वे काऊंटरवरून काढतात तर बहुतेक लोकं ऑनलाईन काढतात. जर तुम्हाला दर महिन्याला एका आयआरसीटीसी युजर आयडीवरून जास्त ट्रेन तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या आयआरसीटीसी युजर अकाऊंटसोबत लिकं करणं बंधनकारक असणार आहे.

(हेही वाचा – Indian Railway: रेल्वेचे आरक्षण करताय, तर आता या प्रवाशांना मिळणार विंडो सीट, काय आहे रेल्वेचा नियम?)

दरम्यान, तुम्ही आधार लिंक न करता आयआरसीटीसी युजर आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त १२ तिकीटे बुक करू शकतात. मात्र जर तुम्ही आधार लिंक केले असेल तर युजर आयडीवरून जास्तीत जास्त २४ तिकिटं बुक करू शकणार आहात.

असे करा आयआरसीटीसीला आधारशी लिंक

  • सर्वप्रथम http://www.irctc.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • यानंतर तुम्हाला तुमचे लॉगिन डिटेल्स भरून MY ACCOUNT या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर Link Your Aadhar या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आधार क्रमांक आणि व्हर्च्युअल आयडीची माहिती भरावी लागेल.
  • चेक बॉक्समध्ये जाऊन Send OTP वर क्लिक करावे लागेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर हा OTP तुम्हाला मिळेल.
  • त्यानंतर Verify वर क्लिक करून आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी अपडेट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • KYC पूर्ण झाल्यानंतर आयआरसीटीसी लिंक होईल आणि ईमेलवर कन्फर्मेशन लिंक आल्यानंतर तुम्ही लॉग-आउट करू शकता.
  • आता तुम्ही IRCTC वेबसाइटवर लॉग आउट करून आणि पुन्हा लॉग इन करून तिकीट बुक करू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.