कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर आता मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड विभागात मद्य विक्री जोरात सुरू झाली आहे. राज्यात तिप्पट मद्य विक्री वाढली असून, सर्वाधिक बियरची विक्री झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे दारुच्या विक्रीत घट झाल्याचे पहायला मिळाले होते. त्या तुलनेत यावर्षी 216 लाख 14 हजार बल्क लिटर बियरची विक्री झाली असून, इतर मद्य प्रकारातही वाढ दिसून आली आहे.
दारू विक्री जोरात
गेल्यावर्षी याच काळात लॉकडाऊनमुळे सार्वजनिक मद्य विक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे मद्य विक्रीत मोठा परिणाम होऊन विक्रीत घट झाली होती. राज्य सरकारने सध्या कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असून, सध्या सायंकाळी चार वाजेपर्यंत मद्य दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. परमिट रुमसुद्धा 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. शिवाय चार वाजता मद्य दुकाने बंद केल्यानंतर घरपोच मद्य विक्री सेवा सुरू आहे. त्यामुळे यावर्षी मद्य विक्रीला चांगलाच जोर आला आहे. मुंबई उपनगरे, ठाणे विभागात सर्वाधिक बियर विक्री झाली आहे. तसेच व्हाईनच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
(हेही वाचाः मंत्रालयात गटारी! कुणी रिचवल्या बाटल्या?)
एप्रिल ते जूनमधली मद्यविक्री
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत गेल्यावर्षी बियर 109.53 लाख बल्क लिटर विक्री झाली. तर यावर्षी 216.14 लाख बल्क लिटर बियर विक्री करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य गेल्यावर्षी 92.30 लाख बल्क लिटरवरुन यावर्षी 175.76, देशी मद्यामध्ये गेल्यावर्षी 36.70 लाख बल्क लिटर, तर यावर्षी 101.87 लाख बल्क लिटर, व्हाईनची गेल्यावर्षी 3.68 बल्क लिटर, तर यावर्षी 7.13 लाख बल्क लिटर विक्री झाल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागात करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community