Ganesh Visarjan : मुंबईतील बंद असलेल्या रस्त्यांची यादी; वाचा एका क्लिकवर

विसर्जन सोहळ्याच्या दिवशी मुंबईत ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई शहरात वाहतूक सुरळीत रहावी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.

( हेही वाचा : बेस्ट बस मार्गात अनंत चतुर्दशीनिमित्त तात्पुरते बदल!)

विभागवार बंद असलेल्या रस्त्यांची यादी

कुलाबा वाहतूक विभाग

 • नाथालाल पारेख मार्ग – बधवार पार्क जंक्शन ते इंदु क्लिनिकपर्यंत

काळबादेवी वाहतूक विभाग

 • जे. एस.एस. रोड – प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शन ते ठाकूरद्वार जंक्शनपर्यंत
 • डी.बी. मार्ग वाहतूक विभाग
 • व्ही.पी. रोड.
 • बी.जे. रोड
 • आर.आर. रोड – चर्नीरोड ते पोर्तुगीज चर्च ते प्रार्थना समाजपर्यंत
 • सी.पी. टॅंक रोड
 • दुसरा कुंभारवाडा रोड
 • संत सेना मार्ग
 • सुतार गल्ली
 • नानुभाई देसाई रोड
 • विठ्ठलभाई पटेल मार्ग
 • सरदार वल्लभभाई पटेल मार्ग

डोंगरी वाहतूक विभाग

 • जिनाभाई मुलजी राठोड मार्ग
 • ताडदेव वाहतूक विभाग
 • पंडिता रमाबाई मार्ग – एन.ए. पुरंदरे मार्ग जंक्शनपासून न्या. सिताराम पाटकर मार्गापर्यंत

भायखळा वाहतूक विभाग

 • भारतमाता ते बावला कंपाऊंड
 • गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकी
 • चिंचपोकळी ब्रिजपासून ते श्रावण यशवंत चौक ( दोन्ही बाजू) काळाचौकी
 • साने गुरूजी मार्ग

भोईवाडा वाहतूक विभाग

 • डॉ.ई.बोर्जेस मार्ग
 • जेरबाई वाडीया मार्ग

दादर वाहतूक विभाग

 • रानडे मार्ग- पानेरी ते चैत्यभूमी
 • ज्ञानेश्वर मंदिर मार्ग – चैत्यभूमी ते सीफेस
 • जांभेकर महाराज मार्ग – सूर्यवंशी हॉल ते चैत्यभूमीपर्यंत
 • स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग – सिद्धिविनायक ते एस. बॅंकेपर्यंत
 • टिळक ब्रिज
 • एस.के. बोले मार्ग

माटुंगा वाहतूक विभाग

 • टिळक ब्रिज – खोदादाद सर्कल ते कोतवाल गार्डनपर्यंत, दोन्ही बाजूंनी बंद

कुर्ला वाहतूक विभाग

 • एल.बी.एस रोड
 • न्यू मिल रोड

चेंबूर वाहतूक विभाग

 • हेमू कलानी मार्ग
 • गिडवाणी मार्ग
 • आर.सी.मार्ग

सांताक्रूझ विभाग

 • लिंकिंग रोड
 • टागोर रोड
 • जुहू रोड
 • जुहू तारा रोड
 • शामराव परूळेकर मार्ग
 • जनार्दन म्हात्रे रोड

विसर्जन मिरवणुकांमुळे ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच ५४ रस्ते एक दिशा मार्ग करण्यात केले आहेत. मुंबईतील ५७ रस्तेमार्गावर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून ११४ ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here