Live in Relationship मधून बाहेर पडलेल्या महिलांचे जीवन खडतर बनतेय – उच्च न्यायालयाचे निरीक्षण

भारतात प्रामुख्याने मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. अशा समुदायात लिव्ह इन रिलेशनसारख्या संबंधाला समाजमान्यता देण्यात आली नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

128

लिव्ह-इन रिलेशनशीपमधून (Live in Relationship) बाहेर पडल्यानंतर महिलेला विवाहासाठी पुरुष जोडीदार मिळणे फार कठीण बनते , तिचे जीवन खडतर बनते, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले. लिव्ह-इनमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

भारतात प्रामुख्याने मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. अशा समुदायात लिव्ह इन रिलेशनसारख्या (Live in Relationship) संबंधाला समाजमान्यता देण्यात आली नाही, म्हणूनच मध्यमवर्गीयांमध्ये अशा विभक्त महिलांना स्वीकारले जात नाही. अशा संबंधांमधून बाहेर पडलेल्या स्त्रीला सामान्य मानले जात नाही. काही अपवाद वगळता कोणतेही कुटुंब स्वेच्छेने अशा महिलेला आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारत नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) बिघडलेल्या संबंधांची प्रकरणे न्यायालयात बरीच प्रलंबित आहेत. अशा संबंधांमधून बाहेर पडलेल्या महिला आत्महत्या करतात. सामाजिक बहिष्कारापासून ते अपमानास्पद टीकाटिपण्णी या सगळ्याचा अशा महिलांना सामोरे जावे लागते. अशा नातेसंबंधांतून बाहेर पडलेल्या महिलेला मध्यमवर्गीयातील सामाजिक नियमांमुळे विवाहासाठी पुरुष जोडीदार मिळणे खूप कठीण बनते. आपल्यासारख्या देशात नैतिकतेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. सर्वात श्रीमंत वर्ग आणि सर्वात खालचा वर्ग यांचा नैतिकतेशी काहीही संबंध नाही, कारण श्रीमंत श्रीमंतीमध्ये मरतात आणि गरीब हे गरिबीत गुदमरतात, असे देखील खंडपीठाने म्हटले.  न्यायालयाने अदनान या आरोपीला जामीन देताना ही निरीक्षणे नोंदवली आहेत, त्याची एप्रिलला सुटका होणार आहे. या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये लग्न करण्याचे वचन नाकारल्याबद्दल अदनानला अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा Mumbai – Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर नवे संकट; चौपदरीच्या नवीन रस्त्याला तडे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.