एसटीचे जाळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करतात. अनेकदा एसटी वेळेत आली नाही तर प्रवाशांची गैरसोय होते परंतु आता तुम्हाला मुंबईतील बेस्ट बसप्रमाणेच एसटीचेही लाईव्ह लोकेशन कळणार आहे.
आगारांमध्ये डिस्प्ले बोर्डवर बसेसचे लाईव्ह लोकेशन कळणार
एसटीला बस स्थानकात येण्यासाठी किती वेळ लागणार, सध्या बस कुठे आहे ते आता सहजपणे प्रवाशांना कळणार आहे. एसटी महामंडळाने नागपूरातील सर्व आगारांमध्ये डिस्प्ले बोर्डवर बसेसचे लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टिम ऑन केले आगे. त्यामुळे कोणताही प्रवासी अगदी सगज बसचे टाईम टेबल पाहू शकतो.
( हेही वाचा : बेबी पावडरचा परवाना रद्द, ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ची उच्च न्यायालयात धाव; ‘या’ तारखेला होणार सुनावणी )
प्रवाशांचा प्रवास होणार सोयीस्कर
काही दिवसात ही सुविधा प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होईल. यामुळे गावची बस कधी येणार याची चौकशी बसस्थानकातील कक्षात जाऊन वारंवार करण्याची गरज नाही. आता प्रवाशांना डिस्प्ले बोर्डावर सध्या बस कोणत्या मार्गावर आहे, तिला संबंधित स्थानकात पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती देण्यात येईल.
लवकरच मोबाईल अॅपमध्ये कळणार एसटीचे लोकेशन
एसटीच्या सर्व बसेसला नागपूर विभागात ट्रॅकिंग सिस्टिमने कनेक्ट करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक आगारात डिस्प्ले बोर्डावर बस कुठे आहे हे कळण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. एसटीच्या अॅपमध्ये लवकरच ही सुविधा सुरू होईल. यामुळे प्रवाशांच्याही अनेक तक्रारींचे निवारण होऊन त्यांचा प्रवास सोयीस्कर होण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community