LK Advani : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

जेव्हा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल तेव्हा पंतप्रधान मोदी देशातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतील अशा शब्दांमध्ये अडवाणी यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक.

284
LK Advani : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

अयोध्येतील राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्याचा निर्णय नियतीने घेतला होता आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाली होती, त्यामुळे या मंदिराचे उद्घाटन हे दैवी स्वप्नाची पूर्तता असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांनी म्हटले आहे.

मागील ७६ वर्षांपासून असलेल्या ‘राष्ट्रधर्म’ या हिंदी साहित्य नियतकालिकाच्या विशेष आवृत्तीत प्रकाशित झालेल्या ‘राम मंदिर निर्माण, एक दिव्य स्वप्न की पूर्ति’ या लेखात अडवाणी यांनी असे म्हंटले आहे की “रथयात्रेदरम्यान पंतप्रधान मोदी त्यांच्यासोबत होते. त्यावेळी ते फारसे प्रसिद्ध नव्हते. पण त्याच वेळी भगवान रामाने आपल्या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आपल्या भक्ताला (मोदी) निवडले होते.” सध्या अडवाणी यांच्या (LK Advani) या लेखाची बरीच चर्चा सुरु आहे.

(हेही वाचा – Atal Setu आजपासून खुला, आता २ तासांच्या प्रवासाला लागणार फक्त २० मिनिटं)

अडवाणी यांनी आपल्या लेखात म्हंटले आहे की –

“त्यावेळी मला वाटले की नियतीने ठरवले आहे की एक दिवस अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर नक्कीच बांधले जाईल. बरं, आता ही फक्त वेळेची बाब आहे “, जेव्हा प्राणप्रतिष्ठा समारंभ होईल, तेव्हा पंतप्रधान मोदी देशातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतील, असेही अडवाणी (LK Advani) यांनी सांगितले.

प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व –

“जेव्हा नरेंद्र मोदी मंदिरात (प्रभू रामाच्या मूर्तीचा) अभिषेक करतील, तेव्हा ते आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतील. हे मंदिर सर्व भारतीयांना श्रीरामाचे गुण स्वीकारण्याची प्रेरणा देईल, अशी मी (LK Advani) प्रार्थना करतो “, असे अडवाणी म्हणाले.

(हेही वाचा – Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराची उभारणी विनासंकट होण्यासाठी वर्षभर यज्ञ)

मी केवळ एक रथी आहे –

“आज रथयात्रेला ३३ वर्षे पूर्ण झाली. २५ सप्टेंबर १९९० रोजी सकाळी जेव्हा आम्ही रथयात्रा सुरू केली, तेव्हा ज्या श्रद्धेने आम्ही ही यात्रा सुरू करत होतो, ती देशात चळवळीचे रूप घेईल हे आम्हाला माहीत नव्हते. रथयात्रा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की मी केवळ एक रथी आहे. रथयात्रेचा मुख्य संदेशवाहक रथच होता आणि तो पूजेसाठी योग्य होता कारण तो मंदिर बांधण्याचा पवित्र उद्देश पूर्ण करण्यासाठी श्रीरामाच्या जन्मस्थळी अयोध्येला जात होता “, असे अडवाणी (LK Advani) यांनी आपल्या लेखात मांडलं आहे.

(हेही वाचा – Ude Desh Ka Aam Nagrik : भारत जागतिक विमान वाहतूक बाजारपेठेचे नेतृत्व करू शकतो – मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया)

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासमवेत अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही उत्तर भारतातील काही भागांमध्ये जातीय हिंसाचारात बदलली.

त्या हजारो गावकऱ्यांच्या दडपलेल्या इच्छा पूर्ण होतील –

ही रथयात्रा माझ्या (LK Advani) राजकीय प्रवासातील “सर्वात निर्णायक आणि परिवर्तनशील घटना” होती. कारण यामुळे मला “भारताचा पुन्हा शोध घेता आला आणि या प्रक्रियेत स्वतःला पुन्हा समजून घेता आले. रथयात्रेदरम्यान असे अनेक अनुभव आले, ज्यांचा माझ्या जीवनावर प्रभाव पडला. दुर्गम गावांतील अज्ञात लोक रथ पाहिल्यानंतर भावनेने भारावून माझ्याकडे यायचे. ते ‘प्रणाम’ करायचे, प्रभू रामाच्या नावाचा जप करायचे आणि निघून जायचे. हा आमच्यासाठी एक संदेश होता की राम मंदिराचे स्वप्न पाहणारे अनेक लोक होते. २२ जानेवारी रोजी मंदिराच्या प्रतिष्ठापनामुळे त्या हजारो गावकऱ्यांच्या दडपलेल्या इच्छा देखील पूर्ण होतील.” असे लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांनी सांगितले.

(हेही वाचा – Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिर प्रतिष्ठापनेपूर्वी ११ दिवस कठोर व्रत पालन, कसे असेल धार्मिक अनुष्ठान; वाचा सविस्तर)

लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांच्या लेखासह नियतकालिकाच्या विशेष आवृत्तीची एक प्रत अयोध्येतील अभिषेक समारंभाला उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये वितरित केली जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.