मुंबईत अघोषित लोडशेडिंग! ठाकरे सरकार करतेय काय? 

89

मुंबई मागील आठवडाभर ४ दिवस वीज जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता ग्रामीण भागातील लोडशेडिंगचा अनुभव घ्यावा लागत आहे. मुंबईतील मध्यवर्ती भाग म्हणून दादर परिसर ओळखला जातो, या भागातच मागील ७ दिवसांत ४ दिवस कधी रात्री तर कधी भर दुपारी वीज गायब झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईत अघोषित लोडशेडिंग सुरु झाले आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

विजेच्या तुटवड्याचा मुंबईला फटका

दादर परिसरात शनिवार, २३  एप्रिल, रविवारी, २४ एप्रिल, सोमवारी, २५ एप्रिल आणि आता बुधवारी, २७ एप्रिल हे चार दिवस वीज गायब झाली. त्यामुळे मुंबईत अघोषित भारनियमन सुरु झाले आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.  या भागात ही वीज कधी रात्री तर कधी दिवसाढवळ्या गेली आहे. सध्या राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळशाचा कमालीचा तुटवडा निर्माण झाल्याने आतापासून राज्यात भारनियमन सुरु झाले आहे. आधीच राज्यात विविध ठिकाणी वीज खंडित केली जात आहे. परंतु मुंबईत शहरात भारनियमन केले जात नाही, तसा नियम आहे. जर मुंबईला विजेचा तुटवडा निर्माण झाला, तर सरकारला अन्य राज्यातून वीज खरेदी करून मुंबईची गरज भागवणे गरजेचे असते, मात्र जर मुंबईत सलग 4 दिवस वीज गायब होत असेल, तर राज्य सरकार वीज खरेदी करत नाही, अशी शंका येते. यामुळे दादर परिसरातील नागरिकांना आधीच उकाड्याने सर्वसामान्यांचे जीवन खडतर केले असताना त्यातच वीज गेल्याने दादरकरांना भारनियमनाचा अनुभव घ्यावा लागत आहे.

(हेही वाचा दादर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वीज गायब)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.