घर बांधण्यासाठी सरकार करणार मदत, जाणून घ्या संपूर्ण योजना

181

घर घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत(पीएमएवाय) कर्ज प्राप्त करुन देण्यात येते. या योजनेंतर्गत पैशांच्या कमतरतेमुळे नागरिकांना आपल्या स्वप्नातील घर बांधण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्ज स्वरुपात मिळणार रक्कम

देशात ग्रामीण भागात बांधली जाणारी घरे पैशांच्या कमतरतेमुळे अपूर्ण राहणार नाहीत. केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून याबाबतच्या अंतिम मसुद्याला अंतिम रुप देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 70 हजार रुपये कर्ज स्वरुपात देण्यात येणार आहे.

2.72 कोटी परवडणारी घरे

हे कर्ज घेण्यासाठी बचत गटांची भूमिका सर्वात महत्वाची असून इच्छुक लाभार्थी बचत गटांच्या हमीवर बँकांकडून घरांसाठी कर्ज घेऊ शकतात. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मार्च 2024 पर्यंत 2.72 कोटी परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. यानुसार मैदानी भागांतील लाभार्थ्यांना 1.20 लाख आणि डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना 1.30 लाख रुपये पायाभूत सुविधांची घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः सीमा क्षेत्रातील महिलांना स्वयंरोजगारित करण्यासाठी सैन्य दल आणि असीम फाऊंडेशनचे मोठे कार्य)

यासाठी येणारा खर्च केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वाटून घेण्यात येणार असून केंद्र-राज्यांमध्ये 60-40 प्रमाणात ही वाटणी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.