- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर व्हाव्यात ही इतर पक्षांप्रमाणे आमचीही इच्छा असून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सरकारी वकिलांशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयालत अर्ली हिअरींगबाबत अर्ज करण्याच्या सूचना दिल्याची राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डी डी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये अडथळा ठरणाऱ्या न्यायालयीन स्थगिती (स्टे) उठवण्याचा प्रयत्न शासनाकडूनच सुरु असल्याने लवकरच हा न्यायालयातील तिढा सुटल्यास या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Municipal Election)
(हेही वाचा – आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांची ‘लाडकी कंपनी योजना’ रद्द करा; डॉ. राहुल घुले यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र)
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त असून अनेक महापालिकांमध्ये चार ते साडेचार वर्षांपासून प्रशासकाच्या हाती कारभार आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महापालिकांच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न विचारला जात असून याबाबत राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डी डी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका न होणे योग्यच नाही. याबाबतचे प्रकरण सर्वोच्य न्यायालयात आहे. या निवडणुकांवर न्यायालयाचा स्टे आहे. त्यामुळे न्यायालयातील हा स्टे उठवण्यासाठी सरकारी वकीलांशी चर्चा केली आहे. त्यांना अर्ली हिअरींगच्या सूचना देत या प्रकरणाची सुनावणी लवकर घेऊन त्यावरील न्यायालयीन स्थगिती उठवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असे त्यांनी सांगितले. (Municipal Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community