मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या जमिनीवर रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल आणि मालगाड्या यांच्यासाठी थांबा ठिकाणे (यार्ड) स्वतंत्र विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. पुनर्विकसित करण्यात येत असलेल्या तिन्ही प्रकल्पांची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल उपस्थित होते.
खोपोली, कसारा ते मुंबई अशा लोकल गाड्या धावतात. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेची सुमारे 100 हून जास्त एकर जमीन आहे. या जमिनीवर मालगाडी, एक्सप्रेस थांबा आणि बाजूलाच मुख्य रेल्वे मार्गीकेवर लोकल थांबा आहे. हे थांबे विस्कळीत असल्याने रेल्वेने या तिन्ही थांब्यांचे पुनर्नूतनीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. या कामांमुळे एक्सप्रेस, मेल गाड्या आणि लोकल यांची स्वतंत्र थांबा ठिकाणे असणार आहेत. हे प्रकल्प कल्याण रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूकडे रेल्वेच्या जमिनीवर सुरू आहेत. या प्रकल्पांची सद्य परिस्थिती पाहण्यासाठी महाव्यवस्थापक गोयल गुरुवारी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह कल्याण येथे आले होते. त्यावेळी मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकल गाड्यांची वाहतूक विभक्त करण्यासाठी कल्याण गुड्स यार्ड येथे चार नवीन कोचिंग फलाट बांधण्यात येणार आहेत.जमीन सपाटीकरण, अंतर्गत छोटे पूल बांधण्यात येणार आहेत. मालगाडी स्वतंत्र मार्गीकेसाठी पहिल्या टप्प्यातील बांधकामामध्ये गटार आणि सीमाभिंतीचे काम, मातीचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रभावित सेवा इमारती आणि कर्मचारी निवास पुनर्वसनसाठी कंत्राट देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Water Storage : सर्व धरणातील पाणी साठ्यात वाढ: संभाव्य पाणी कपात टळणार)
प्रस्तावित ट्रॅकच्या अलाइनमेंटमध्ये येणाऱ्या सेवा इमारतीचे बांधकाम सुरू आहे. 10 सेवा इमारतींपैकी ८ इमारतींचे काम प्रगतीपथावर असून, यामध्ये 8 इमारतींच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. ट्रॅकशी संबंधित कामांचे कंत्राट देण्यात आले आहे. यार्डातील जुने रेल्वे मार्ग तोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
हेही पहा –