Local Railway Jumbo Block: ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारने सांगितली पर्यायी वाहतूक व्यवस्था!  

502
Local Railway Jumbo Block: ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारने सांगितली पर्यायी वाहतूक व्यवस्था!  

मध्य रेल्वे (Central Railway) मार्फत तांत्रिक कामासाठी दिनांक ३० मे २०२४ रोजी मध्यरात्री पासून ठाणे स्थानकात ६३ तासांचा विशेष जम्बो ब्लॉक (Jumbo Block) घेण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक आणि भायखळा रेल्वे स्थानक तसेच हार्बर लाइनवरील छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते वडाळा येथे ३६ तासांचा विशेष जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली व्हावी, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून (PSV) प्रवाशांच्या वाहतूकीस सदर जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीत टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असं सरकारने जारी केलेल्या निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे आता खासगी बसेसला प्रवासी वाहने म्हणून चालवणं शक्य होणार आहे. (Local Railway Jumbo Block)

सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रस्तावित जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे, असं शासनाला वाटतं. त्यादृष्टीने आता मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९८८ च्या ५९) चे कलम ६६ चे उपकलम (३) च्या खंड (एन) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करुन हा निर्णय घेतला आहे, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच सदर जम्बो ब्लॉक संपल्यानंतर सदर अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असंही शासनाच्या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सोईसाठी हा निर्णय घेतल्याबद्दल मध्य रेल्वेकडून राज्य सरकारचे आभार मानण्यात आले आहेत.  (Local Railway Jumbo Block)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.