Local Railway New Timetable: मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकातून ऑगस्टपासून धावणार १० नव्या लोकल गाड्या

746
Mumbai Local : मुंबईकरांना मोठा दिलासा; तीन वर्षांत लोकल ट्रेन फेऱ्या होणार दुप्पट

मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबईकरांची ‘लाइफ लाइन’ म्हणून ओळखली जाणारी लोकलसंबंधी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दादर स्थानकापासून (Dadar Railway Station) दररोज १० लोकल गाड्या सुरू होत आहेत. दादर आणि सी. एस. एम. टी.स्थानकातून सुटणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये (Local Train) प्रवासी (Passengers) चढू शकत नसल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दादरहून लोकल ट्रेनमध्ये चढता येत नसल्याची तक्रार प्रवासी अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे करतात. त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Local Railway New Timetable)

(हेही वाचा – Dibrugarh Express Train Derail : उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात, रेल्वेचे 10-12 डब्बे रुळावरुन घसरले)

अतिरिक्त १४ लोकल गाड्या परळ रेल्वे स्थानकापासून सुरू होतील. नवीन वेळापत्रक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होईल. लवकरच सी. एस. एम. टी. ऐवजी दादर येथून १० लोकल गाड्या सुटणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही. नव्या वेळापत्रकानुसार सीएसएमटी ते ठाणे (CSMT to Thane) या ६ लोकल गाड्यांचा मार्ग कल्याणपर्यंत वाढवण्यात आला आहे. (Local Railway New Timetable)

(हेही वाचा – UPSC निवड यादीपासून ते IFS बनावट आयडीपर्यंत… कोण आहे IFS Jyoti Mishra?)

दादरहून सुटणाऱ्या २४ स्लो लोकल गाड्या आता परळहून सुटतील. त्याऐवजी दादर येथून १० जलद लोकल गाड्या सुटतील. नवीन वेळापत्रकानुसार हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांच्या वारंवारतेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सी. एस. एम. टी. (CSMT) वरून सुटणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे दादर रेल्वे (Dadar Railway Station) स्थानकावर प्रवाशांना ट्रेनमध्ये चढता येत नाही. प्रवाशांना रेल्वे स्थानकावर बराच वेळ वाट पाहावी लागते. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Local Railway New Timetable)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.