सोमवार २६ जून रोजी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती, त्यानंतर हार्बर मार्गावरची सेवा विस्कळीत झाली होती. अशातच मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार २७ जून रोजी पुन्हा एकदा अंबरनाथ स्थानकात गोंधळ उडाला.
अंबरनाथ येथून सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये यार्डात प्रवेश करू न दिल्याने मंगळवारी रेल्वे प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल रोको केला. सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत लोकल फलाटावर मार्गस्थ केली. मात्र त्यामुळे लोकलला १० मिनिट उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांच्या वेळापत्रकात गडबड झाली. अशातच रेल्वे अडवून ठेवणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
(हेही वाचा – महाराष्ट्रातील सर्व निवडणुका महायुतीत लढणार – चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा)
नेमका प्रकार काय?
अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळी अनेक लोकल सोडल्या जातात. यातील काही लोकल अंबरनाथ येथील रेल्वे यार्डात उभ्या असतात. अनेक प्रवासी जागा मिळवण्यासाठी यार्डातच लोकल मध्ये जाऊन बसतात. त्यांनतर लोकल फलाटावर येते. मंगळवारी नेहमीप्रमाणे काही प्रवासी लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी यार्डात पोहोचले. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना लोकलमधून उतरून फलाटावर जाऊन लोकल पकडण्याचे सुचवले. यातील अनेक प्रवाशांनी सुरुवातील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना विरोध केला. त्यानंतर काही प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी लोकल फलाट क्रमांक दोनला लागण्यापूर्वीच लोकल रोखून धरली. यामुळे रेल्वे रुळांवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community