ऐन गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टिटवाळा-कसारा लोकलसेवा उशिराने धावत आहेत. नोकरदार वर्ग घरी जाण्याच्या वेळेत ही घटना घडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
माहितीनुसार, टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वेवरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. सध्या लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. तसेच सध्या हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले असून यामुळे इतर लोकलवर परिणाम झाला आहे. शिवाय ऐन गर्दीच्या वेळेत प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
(हेही वाचा – ‘बेस्ट’च्या डबलडेकर बसमधून फक्त ६ रुपयांमध्ये प्रवास! असा असेल मार्ग)
Join Our WhatsApp Community