Local Train : कुर्ला स्टेशनवर लोकलमधून धूर, प्रवाशांमध्ये गोंधळ

78
मुंबई प्रतिनिधी:
Local Train : कुर्ला रेल्वे स्टेशनच्या (Kurla Railway Station) प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून अचानक धूर (local train smoke) निघाल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी रुळांवर उड्या मारल्या. यामुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. (Local Train)

(हेही वाचा – Maharashtra Waqf Tribunal साठी राज्य शासनाकडून निधी मंजूर!)

रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पनवेलकडे जाणारी लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर (Local train platform) थांबली असताना अचानक तिच्या डब्यातून धूर निघू लागला. धुराचे लोट पाहून प्रवासी घाबरले आणि काहींनी खिडक्या-दरवाजामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी थेट रुळांवर उड्या मारल्या. या गोंधळात काही प्रवाशांना किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, लोकलच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडली असावी. रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून, धुराचे नेमके कारण शोधले जात आहे. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि अनेक गाड्या उशिराने धावल्या. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – Fraud : कस्टमने जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक)

रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून, वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईच्या लोकल (Mumbai local) प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, रेल्वे सुरक्षा सुधारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.