लोकल नोव्हेंबरमध्ये सुरू होणार? 

123
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल केव्हा सुरू होणार असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकराना पडला असून, लोकल सुरू व्हायला नोव्हेंबर महिन्याची वाट पहावी लागणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) मुंबई महापालिकेला सुचवले आहे की १ नोव्हेंबरपासून ऑफिसेस, लोकल आणि १ जानेवारी २०२१ पासून शाळा सुरु करु शकतात. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने शास्त्रीय मॉडेलवर काढलेली ही तारीख आहे.
पालिकेला अहवाल सादर
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने कोविड – १९ साथीचा रोग या विषयावर गणितीय पद्धतीने शास्त्रीय मॉडेल बनवत अंदाज व्यक्त केला आहे आणि बीएमसीला सादर केला आहे.
काय सांगतो अहवाल
१ नोव्हेंबर ही मुंबईची कार्यालये आणि वाहतुकीचं नेटवर्क पूर्णपणे उघडण्यासाठी गणितीय पद्धतीने केलेल्या अभ्यासाच्या आधारे काढलेली शास्त्रीय तारीख आहे. स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्यूटर सायन्सचे डीन संदीप जुनेजा यांनी अहवालात म्हटले आहे की, जानेवारी २०२१ मध्ये शाळा पुन्हा सुरू होऊ शकतात.
सार्वजनिक वाहतुकीमध्ये सामाजिक अंतराचे निकष पाळले पाहिजेत आणि मास्कचा अनिवार्य वापर, हातांची स्वच्छता आणि गाड्या व कामाच्या ठिकाणी नियमित निर्जंतुकीकरण यासारख्या स्वच्छतेच्या उपायांचे पालन केले पाहिजे, असेही अहवालात म्हटले आहे.
हार्ड इम्युनिटीबाबत अहवालात म्हटले आहे की, यावर्षी डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत जवळजवळ ७५% झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये तर अन्य भागातील ५०%लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होतील.
टीआयएफआरच्या टीमने म्हटले आहे की, मुंबईत सप्टेंबर महिन्यात कार्यालयांमध्ये उपस्थिती आणि परिवहन यंत्रणेची क्षमता या दृष्टीने शहर ३० टक्क्यांनी सुरु केली जाऊ शकते. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते. शहर आणखी हळूहळू खुले केले पाहिजे आणि १ नोव्हेंबरच्या सुमारास पूर्ण कार्यान्वित व्हावे, असे डॉ जुनेजा यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.