देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने सोमवारी, (8 जुलै) 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या (Local Train) उशिराने धावत आहेत.
त्याचबरोबर मुंबईतील (Mumbai) सर्व बीएमसी (BMC), सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुराचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे पथक अनेक जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहे. मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्यावरही अनेक पर्यटक अडकून पडले आहेत.
(हेही वाचा – Narendra Modi Russia Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉस्कोमध्ये स्वागत; पुतीन यांच्यासोबत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा)
कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक आता पुन्हा सुरळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर ठाण्यापासून पुढे पाणी साचल्यामुळे ठप्प झालेलली लोकल आता पुन्हा सुरू झाली. या मार्गावरील धिम्या आणि जलद, अप आणि डाऊन दिशेने वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
पाणी ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू
सायंकाळी पाणी ओसरू लागल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. कुर्ला आणि सायनदरम्यान साचलेलं पाणी ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली. सीएसएमटी ते ठाणे, ठाणे ते कर्जत आणि कसारा अशी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली, तरी ती थोड्या उशिराने सुरू आहे. चुनाभट्टी येथील पाणी कमी झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूकदेखील सुरू झाली आहे. चुनाभट्टी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसटीदरम्यान लोकलसेवा पुन्हा सुरू झाली आहे. हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community