Local Train Update : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प!  

231
Local Train Update : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प!  
Local Train Update : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प!  

मुंबई शहरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसला आहे. भांडुप ते कुर्ला (Bhandup to Kurla local railway stopped) दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे मार्गावरची सेवा ठप्प झाली होती. बुधवारी रात्री साडेनंतर जागोजागी लोकल उभ्या होत्या, जवळपास दोन तासांनतर रात्री साडेदहाच्या सुमारास हळूहळू वाहतूक सुरू झाली. दादर, घाटकोपर भांडुप या स्थानकांत (Ghatkopar Railway Station) प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. (Local Train Update)

लोकल सेवा आणि एक्स्प्रेस गाड्या जवळपास दोन तासापासून बंद होत्या.  दादर, कुर्ला, घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. लोकल सेवा कधी सुरू होते याची वाट पाहण्याशिवाय प्रवाशांकडे कोणताही पर्याय नव्हता. घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. (Local Train Update)

(हेही वाचा – “मला मुख्यमंत्री व्हायचंय पण…”, DCM Ajit Pawar नेमकं काय म्हणाले?)

अंधेरी, गोरेगावमध्ये पावसाची बॅटिंग

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पाऊस पडला. मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचले आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.