लोणावळ्यासाठी ३० जानेवारीपासून धावणार १५ लोकल ट्रेन!

शिवाजीनगर स्थानकांवर लोकलसाठी नवे टर्मिनल बांधण्याचे काम पूर्ण झाले. काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या ब्लॉक मध्ये हे ओव्हरहेडचे काम पूर्ण केले आहे. यामुळेच या नव्या फलाटावरुन लोणावळ्यासाठी ३० जानेवारीपासून लोकल धावतील.

( हेही वाचा : 55 प्रवाशांना न घेताच उड्डाण; DGCA कडून ‘गो-फर्स्ट’ला 10 लाखांचा दंड )

पंधरा लोकल शिवाजीनगर स्टेशनवरून सुटणार 

लोकल सुरू झाल्यावर पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या लोकलच्या संख्येत मोठी घट होणार आहे. पुणे स्टेशनवरचा लोकलचा भार हलका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर स्टेशनवर ईएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट अर्थात लोकल) टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३३० मीटर लांबीचे नवीन फलाट तयार केले. यासाठी सुमारे १ कोटींचा खर्च करण्यात आला. हे टर्मिनल सुरू झाल्यावर लोणावळ्याला जाणाऱ्या सुमारे पंधरा लोकल शिवाजीनगर स्टेशनवरून सुटतील. परिणामी, पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकलची संख्या कमी होईल.

ज्या लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो त्याच लोकल पुणे स्टेशनवरून सुटणार आहेत. इतर लोकल गाड्या शिवाजी नगर स्थानकावरून सुटणार आहेत. पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या डब्यात संख्येत वाढ केली जाणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here