हार्बर मार्गावर लोकल ट्रेन लवकरच बोरिवलीपर्यंत धावणार; कसा आहे प्रकल्प?

89

सध्या हार्बर लोकल गोरेगावपर्यंत धावत आहे. या सेवेचा लवकरच विस्तार करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि झाडांचे सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता हार्बर मार्गवर लोकल सेवेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : रेशनकार्ड धारकांसाठी सरकारची मोठी घोषणा! १५० किलो धान्य मिळणार मोफत )

हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-अंधेरी-गोरेगावदरम्यान लोकल धावतात. गोरेगाव पनवेल ही लोकल सेवा सुद्धा सध्या सुरू आहे. यापूर्वी गोरेगावऐवजी अंधेरीपर्यंत हार्बर लोकल सेवा सुरू होती. तसेच अंधेरीपासून पुढील प्रवास प्रवासी पश्चिम रेल्वे लोकलने करत होते. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. मार्च २०१९ पासून गोरेगावपर्यंत लोकल धावू लागल्या. आता हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विस्तारीकरणाचे काम पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे.

हार्बर मार्गाचा बोरीवलीपर्यंत विस्तार

  • गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान सात किलोमीटर मार्गाचा विस्तार
  • प्रकल्पाचा खर्च ८२५ कोटी ३१ लाख रुपये
  • प्रवासी संख्येत २०३१ पर्यंत प्रवाशांच्या संख्येत २ ते ३ लाखांची वाढ होईल.
  • सध्या बोरीवलीपर्यंत पाच मार्ग असून सहावा मार्गही उभारण्यात येणार आहे. भविष्यात हार्बरवर आणखी दोन
  • मार्गिकांची भर पडणार आहे. त्यामुळे बोरीवलीपर्यंत ८ मार्गिका असतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.