हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत; वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने

119

सकाळी कामाला जाण्यासाठी बाहेर पडणा-या नोकरवर्गाला मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरची लोकलसेवा ठप्प झाली होती. जुईनगरजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. परंतु, आता बिघाड दुरुस्त झाला आहे. मात्र, तरिही हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीतच आहे. त्यामुळे लोकलच्या प्रवाशांची सकाळ त्रासदायक ठरली आहे.

वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने

हार्बर मार्गावरील बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ दखल घेत बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, तरिही हार्बर मार्गावरील वाहतूक अद्याप उशिरानेच सुरु आहे. विस्कळीत असलेली उपनगरीय रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यास उशीर होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बिघाड दुरुस्त होऊनही उपनगरीय रेल्वेसेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे. तब्बल एक तास हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प होती. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने सकाळी कामाला जाण्याच्या गडबडीत असणा-या चाकरमान्यांना मोठा फटका बसणार आहे.

( हेही वाचा: RTO च्या नव्या सुविधा; आता घरबसल्या घेता येणार 14 सुविधांचा लाभ )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.