Kharkopar-Uran Railway: खारकोपर-उरण रेल्वेमार्गावर आठवडाभरात लोकल धावणार, रेल्वच्या पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात

रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठवडाभरात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

128
Kharkopar-Uran Railway: खारकोपर-उरण रेल्वेमार्गावर आठवडाभरात लोकल धावणार, रेल्वच्या पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात
Kharkopar-Uran Railway: खारकोपर-उरण रेल्वेमार्गावर आठवडाभरात लोकल धावणार, रेल्वच्या पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात

खारकोपर-उरण रेल्वेमार्गावर (Kharkopar-Uran Railway) आठवडाभरात लोकल ट्रेन धावणार आहे. खारकोपर-उरण रेल्वेमार्गासह पाच स्थानकांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. रहिवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर लोकल चालवण्याकरिता मध्य रेल्वेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. रेल्वेच्या विद्युत वाहनाने या मार्गावरील विद्युत तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

मध्य रेल्वेने बेलापूर-खारकोपर सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे लोकसभा निवडणुकीआधी नोव्हेंबर २०१८मध्ये उद्घाटन करत लोकल सेवा केली आहे. या मार्गावर सध्या बेलापूर-खारकोपरदरम्यान २०, तर नेरुळ-खारकोपरदरम्यान २० लोकल गाड्या चालवल्या जात आहेत. हाच मार्ग पुढे उरण रेल्वेने १४.६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गिकेसह गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके (Gavan, Ranjanpada, Nhava Sheva, Dronagiri and Uran ) विकसित केली आहेत.

(हेही वाचा – Crime : मुस्लिम कुटुंबियांकडून नवविवाहित जोडप्याची हत्या )

या रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठवडाभरात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेनेही त्याची पूर्वतयार सुरू केल्याची माहिती दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.