चीनमध्ये लॉकडाऊन, आयफोनच्या कर्मचा-यांना घरांत डांबले

147

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे चीनमधील काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठा आयफोन उत्पादन प्रकल्प असलेल्या फॉक्सकॉनच्या कारखाना परिसरात चीन सरकारने बुधवारी लॉकडाऊन लावल्यामुळे तब्बल 6 लाख आयफोन कर्मचारी आपल्या घरात अडकले आहेत. मध्य चीनमधील झेंगजोऊ परिसरात हा प्रकल्प आहे.

घराबाहेर पडण्यास मनाई

गेल्या काही दिवसांपासून चीनमधील या भागात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात आपली घरे सोडून चालली आहे. त्यांच्या या स्थलांतरामुळे इतर भागांत देखील कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असल्याने चीन सरकारने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

कर्मचा-यांमध्ये नाराजी

चीनमधील या प्रकल्पाच्या कर्मचा-यांनी प्रकल्पातील गैरसोयीबाबत याआधी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. प्रकल्पातील दुरावस्थेबाबत ऑनलाईन तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील पुरेशा प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे लॉकडाऊन लागल्यास अडकून पडण्याच्या भीतीने कर्मचारी आपले ठिकाण सोडून जाऊ लागले होते.

चीनमध्ये मनमानी

चीनमध्ये मनमानी पद्धतीने लॉकडाऊन लावण्यात येत आहे. तसेच झेंगजाऊ परिसरात राहणा-या नागरिकांना न्यूक्लिक अॅसिड टेस्ट देखील सरकारकडून बंधनकारक करण्यात आली आहे. नियम मोडणा-यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देखील सरकारकडून देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.