…तर जून महिनाही लॉकडाऊनमध्ये जाणार!

जून महिन्यातही कडक निर्बंध ठेवून साथीचे आजार आणि कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा मानस असून, कदाचित जून महिन्यात देखील काही दिवस लॉकडाऊन कायम राहील, अशी माहिती मिळत आहे.

राज्यात कोरोना संकटामुळे 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून, या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होताना दिसत असून, जून महिन्यात देखील आता जे निर्बंध कायम ठेवण्याचा विचार आतापासूनच राज्य सरकार करत आहे.

म्हणून जून आणि जुलै महिना राज्यासाठी महत्वाचा!

जून आणि जुलै महिना म्हटला की, ते पावसाळ्याचे दिवस असतात. या काळात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरत असतात. त्यातच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे जून महिन्यातही कडक निर्बंध ठेवून साथीचे आजार आणि कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा मानस असून, कदाचित जून महिन्यात देखील काही दिवस लॉकडाऊन कायम राहील, अशी माहिती मिळत आहे.

(हेही वाचा : आता शिवसेनेचे अनिल अडचणीत… मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी)

राज्यात 1 जूनपर्यंत हे आहेत नियम!

  • राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून, सध्या परराज्यातून महाराष्ट्रात येणा-यांना 48 तासांच्या आधीचा RT-PCR रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्राने घोषित केलेल्या संवेदनशील राज्यांतून येणा-या प्रवाशांना RT-PCR रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक आहे. परराज्यातून मालवाहूतक करणा-यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असावा. हा रिपोर्ट 7 दिवस ग्राह्य धरला जाईल.
  • मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाच परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाने त्या बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घ्यावा, असे देखील नियमावलीत सांगण्यात आले आहे.
  • दूधाच कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी देण्यात आली आहे.


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here