कडक निर्बंध लावूनही राज्यात गर्दी नियंत्रणात येत नाही, पर्यायाने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अखेर गुरुवार, २२ एप्रिलपासून राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकल गाड्या सुरु असणार आहेत, त्यामुळे सर्वांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जरी राज्य सरकारने लोकल प्रवास हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी खुला असल्याचे म्हटले असले, तरी त्यात कुणाचा समावेश आहे, या विषयी अद्याप निश्चित कुणाला माहित नाही. म्हणून अखेर रेल्वेने कोणत्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल, याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
लोकल प्रवासाची यांना मुभा!
केंद्र व राज्यातील कर्मचारी
- रेल्वे कर्मचारी, एमआरव्हीसी, आयआरसीटीसी, मंत्रालय आणि जिल्ह्याधिकारी कार्यालय
- स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांचे शिक्षक आणि कंत्राटी कर्मचारी (मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पालघर)
- महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस, रेल्वे पोलिस
- बेस्ट, राज्य परिवहन, मीरा-भाईंदर, वसई-विरार, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिवहन सेवा
- सर्व केंद्र शासनाची कार्यालये आणि सार्वजनिक कंपन्या
- संरक्षण, आयकर, जीएसटी, कस्टम, पोस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायपालिका, राजभवन
(हेही वाचा : कोरोना सर्वत्र म्युटेंट होतोय, फक्त अमरावतीचाच विचार नको! डॉ. अविनाश सुपेंचा सल्ला )
वैद्यकीय क्षेत्र
- सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील कर्मचारी, लॅबचे कर्मचारी, औषध निर्माण आणि वितरण करणारे
- वैद्यकीय तातडी असलेली व्यक्ती आणि तिच्यासोबत एक व्यक्ती बाहेर गावी रेल्वेने जाणारे प्रवासी (प्रवासाच्या दिवशी)