मार्च २०२० मध्ये भारतात लॉकडाऊन सुरू झाले यावेळी अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळताना अडचणी येत होत्या. या कठीण काळात डोंबिवलीमधून आपल्या सात महिन्यांच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याची आई मुंबई आणि त्यानंतर नवी मुंबईत जात होती. लॉकडाऊन झाले त्याचवेळी आपल्या मुलाला कावीळ झाल्याचे निदान झाले. कावीळचे निदान ते पहिल्या लॉकडाऊन काळात मुलाचे यकृत निकामी झाल्याने त्याला वाचवण्याची धडपड… हे सर्व आठवले की देवासारखे धावून आलेल्या डॉक्टरांना वृषाली वर्मा धन्यवाद देतात. अपोलो रुग्णालयाने सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून यकृत प्रत्यारोपणाचा कार्यक्रम राबवला त्यावेळी वृषाली वर्मा यांनी त्या दिवसांची आठवण सांगितली. तसेच कोणत्याही नवजात मुलाला आणि आईला या यातना नकोत, अशी कहाणी सांगितली.
(हेही वाचा : पीएफआयच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन पाकिस्तानी; एटीएसच्या चौकशीत माहिती उघड )
लॉकडाऊन झाला तेव्हा वृषांत सहा महिन्यांचा होता. त्याआधी दोन महिन्यांपूर्वीच वृषांतला कावीळ झाल्याचे निदान झाल्याने जीवाची घालमेल सुरु होती, अशी आठवण वृषाली वर्मा यांनी सांगितली. अगदी दक्षिण मुंबईत एका टोकाला असलेले जसलोक रुग्णालय ते नंतर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयापर्यंत जाणे असो, दोन महिने नुसती धडपड सुरु होती. या दोन महिन्यांत १५ ते १६ वेळा वृषांतच्या शरीरात तयार झालेले पाणी काढायला डॉक्टरांकडे धाव सुरु होती. त्याची तब्येत ढासळत होती. अशातच अपोलो रुग्णालयात तपासणी सुरु झाल्यानंतर वृषांतला यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे असल्याचे समजले. त्यासाठी आर्थिक तरतूदही करणे गरजेचे होते. केवळ शस्त्रक्रियेसाठी १५ ते १७ लाखांचा खर्च अपेक्षित होता. रुग्णालयाने क्राउड फंडिंगचा पर्याय सूचवला. अखेर पैशाची जुळवाजुळव यशस्वी झाली, अन् माझ्याच शरिरातील यकृताचा काही भाग प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी वापरला गेला. या गोंधळात लॉकडाऊन झाले. परदेशातून अपोलोसाठी डॉ. डॅरियस मिर्झा प्रत्यारोपणासाठी येणार होते. मात्र प्रत्यक्षात शस्त्रक्रियेसाठी चार महिन्यांचा विलंब लागला. या चार महिन्यांत डॉक्टरांनी वृषांतच्या डाएटवर लक्ष दिले. त्याच्या वजनावर काम केले गेले. अखेर डॉ. मिर्झा यांच्या टीमने वृषांतवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. मात्र ते दिवस बरंच काही शिकवून गेले, असे वृषाली वर्मा सांगतात.
Join Our WhatsApp Community