Lok Sabha Election 2024 : मुंबई उपनगरात २२९० मतदारांनी घरबसल्या केले मतदान

मुंबई उपनगर जिल्ह्यात २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व आणि २९- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे.

128
Lok Sabha Election 2024 : मुंबई उपनगरात २२९० मतदारांनी घरबसल्या केले मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग अशा २,७३५ मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी दोन हजार २९० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

मुंबई उपनगर जिल्ह्यात २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व आणि २९- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मुंबईत ११ सखी मतदान केंद्र)

मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहमतदारांची संख्या आहे एवढी

तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अशा मतदारांची संख्या दोन हजार ७३५ एवढी आहे. या मतदारांच्या घरी मतदान पथके पाठवून टपाली मतपत्रिकेद्वारे त्यांच्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदान पथकांमध्ये एक मतदान अधिकारी, सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक पोलिस, एक व्हीडिओग्राफर यांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)

नोंदणी केलेल्या ८५ वर्षांपेक्षा जास्त वय आणि दिव्यांग मतदारांना मतदानाच्या वेळापत्रकाची माहिती संबंधित उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवार अशा मतदान पथकांसमवेत त्यांचे प्रतिनिधी मतदानाच्या वेळी त्यांचा प्रतिनिधी उपस्थित ठेवू शकतात. गृहमतदानाच्या वेळी मतदाराच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन हजार २९० मतदारांचे गृहमतदान पूर्ण झाले आहे. गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.