निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत मतदार, उमेदवारांच्या मदतीसाठी विविध प्रकारचे ॲप, पोर्टल सुरू केले आहेत. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांची नागरिकांना थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्याची पहिल्या १०० मिनिटांत दखल घेतली जाणार आहे. (Lok Sabha Election 2024)
लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात २० मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे, काय करू नये याविषयी निवडणूक आयोग उमेदवार व राजकीय पक्षांना माहिती देते. मात्र, काही वेळा आचारसंहितेचे उल्लंघन केले जाते. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – S. Jaishankar : भारताला UNSC मध्ये निश्चितच कायमस्वरूपी सदस्यत्व मिळेल; एस. जयशंकर यांचे आश्वासक विधान)
ही माहिती ॲपवर पहाता येणार
त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटिझन ॲप विकसित केले आहे. यावर येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही केली जात आहे. यासह एकूण १२ ॲप, पोर्टलही सुरू केले आहेत. (Lok Sabha Election 2024)
यातील नो युवर कँडिडेट ॲपवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर कुठला गुन्हा दाखल आहे, त्यांचे शिक्षण किती आदी माहिती नागरिकांना पाहता येणार आहे. काही ॲप नागरिकांना तर काही ॲप कर्मचाऱ्यांना वापरता येणार आहेत. त्यामुळे आचारसंहिता उल्लंघनासह निवडणूक कामकाज सुलभ झाले आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community