महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेने चार लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन मतदार संघ काँग्रेसला सोडले असून यातील उत्तर मुंबईत अद्यापही काँग्रेसला उमेदवार सापडत नाही. त्यामुळे मुंबईतील उत्तर मुंबईचा मतदार संघही उबाठा शिवसेनेला देऊन टाकावा आणि गरज भासल्यास उत्तर मध्य मुंबईचाही मतदार संघही द्यावा. काँग्रेसने मुंबईतून एकही जागा लढू नये अशाचप्रकारची नाराजी वजा खदखद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे. (Lok Sabha Election 2024)
उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन मतदार संघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आले असून उत्तर मध्य मुंबईतून स्वरा भास्कर यांचे नाव चर्चेत आहे. पण उत्तर मुंबईतून एकही उमेदवार काँग्रेसला मिळत नाही. त्यामुळे यासर्व मतदार संघाच्या बदल्यात दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई हे दोनच मतदार संघ काँग्रेसला पुरक होते. परंतु तिथे शिवसेनेने उमेदवार दिल्याने जागा वाटपाची शक्यताच मावळली आहे. त्यामुळे या दोन्ही उत्तर आणि उत्तर मध्य मुंबईत आधीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हार मानायला सुरुवात केली असून शिवसेनेने आधीच सर्व उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून भाजपा, शिंदे गटाचे नेते दूर)
उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या म्हणण्यानुसार, मागील वेळेस उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीत उतरवले होते. परंतु यंदा त्याही आमच्या पक्षाकडे नसून त्या शिवसेनेकडे गेल्या आहेत. परंतु हा मतदार संघ जरी काँग्रेसला सोडला असला तरी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य जास्त नसून त्यातुलनेत उबाठा शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदार संघ उबाठाला सोडावा अशी प्रकारची आमची मागणी होती. परंतु तेच मतदार संघ काँग्रेसला सोडून केवळ हरणाऱ्या जागा आम्हाला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिंकणाऱ्या जागा आणि उमेदवाराच्या जोरावर निवडणूक लढावी अशी भूमिका पक्षाची होती,परंतु शिवसेनेने परस्पर जागा जाहीर करून एकप्रकारे काँग्रेससोबत आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे सर्वच जागा कशाप्रकारे निवडून यावे हीच आमची मागणी आहे. परंतु जर ते मान्य करणार नसतील तर उर्वरीत दोन्ही जागाही त्यांनाच देऊन टाकाव्या अशी प्रकारची नाराजीच व्यक्त केली जात आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community