Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – हिर्देश कुमार

अधिक 'पोलिंग बूथ' असलेल्या मतदान केंद्रांवर मतदार यादीमध्ये नाव शोधणे, मतदान केंद्र दाखविणे यासाठी मतदार सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात यावी. असे हिर्देश कुमार म्हणाले.

138
Urban Voters : शहरी मतदारांना मतदानासाठी उतरविण्याचे राजकीय पक्षांसमोर आव्हान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्याच्या अनुषंगाने निवडणूक प्रशासनाने काटेकोरपणे तयारी करावी. पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार यांनी दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पाचव्या टप्प्यातील तयारी संदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरिक्षकांच्या बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. या बैठकीत आढावा घेताना हिर्देश कुमार बोलत होते. (Lok Sabha Election 2024)

उपआयुक्त कुमार म्हणाले की, राज्यात आतापर्यंत २४ मतदारसंघासाठी मतदान झालेले आहे. या निवडणुका सुरळीतपणे पार पडल्या आहेत. येणाऱ्या पाचव्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढण्यासाठी यंत्रणेने समन्वयाने प्रयत्न करावेत. कुमार पुढे म्हणाले, अधिक ‘पोलिंग बूथ’ असलेल्या मतदान केंद्रांवर मतदार यादीमध्ये नाव शोधणे, मतदान केंद्र दाखविणे यासाठी मतदार सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात यावी. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था असावी. ज्यामुळे मतदान टक्का वाढण्यास मदत होईल. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर उन्हापासून बचाव करण्याच्या सुविधा देण्यात याव्यात. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Dabholkar Murder Case : रोहित पवारांची नेटकऱ्यांनी काढली अब्रू)

हिर्देश कुमार यांनी दिल्या ‘या’ सुचना 

महाराष्ट्र राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार यांनी मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी, मतदानासाठी होणाऱ्या लांब रांगा असतील तर या दिवशी घेण्यात येणारी खबरदारी, मतदान करताना मतदारांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या. विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम. के. मिश्रा म्हणाले की, पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळताना कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत. याबाबत मार्गदर्शक तत्वे भारत निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावर उपलब्ध आहेत. मतदारांना मतदान केंद्र कुठे याची माहिती होण्यासाठी संपर्क क्रमांक प्रसिद्ध करावा. समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या फेक न्यूज अथवा काही अनुचित मजकूर प्रसारित होत असल्यास तत्काळ कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (Lok Sabha Election 2024)

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली निवडणुकीची तयारी, निवडणुकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्था आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी सादरीकरणाव्दारे निवडणूक तयारीची माहिती दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निरीक्षकांनी विविध सूचना केल्या. महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी प्रशासनाने केलेल्या तयारी बाबतची माहिती सादर केली. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.